जळगावात भीषण अपघात, ऑडी आणि होंडा सिटीची समोरासमोर धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

जळगावात भीषण अपघात, ऑडी आणि होंडा सिटीची समोरासमोर धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

जळगावच्या पारोळा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगावच्या पारोळ्यातील म्हसवे फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात लोणी येथील पती-पत्नी जागीच ठार झाले आहेततर चार जण जखमी झाले आहेत. ज्योती सुधीर पाटील, सुधीर देविदास पाटील असं मयत दाम्पत्याचे नाव आहे. अपघातातील जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या भीषण अपघातात दोन्ही महागड्या कार चक्काचूर झाल्या आहेत. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगावकडून येणाऱ्या ऑडी कारने पारोळ्यातील म्हसवे फाट्यावर वळण घेत असलेल्या होंडा सिटी कारला जोरदार धडक दिली. दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. या अपघातात ज्योती सुधीर पाटील, सुधीर देविदास पाटील जागीच ठार झाले. पाटील कुटुंब हे होंडा सिटी JJ 05 R 1247 कारने सुरतहुन पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे चुलत भावाच्या मुलीच्या लग्नासाठी सुरतहुन पारोळा तालुक्यातील लोणी बु येथे जात होते. दरम्यान सुधीर पाटील यांच्या कारला म्हसवे फाट्यावर जळगावकडून समोरून येणारी ऑडी क्रमांक डीडी 03 के 6906 ने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. यात नाशिक येथील शिरीष लठ्ठा, उमेश लाने, चालक प्रवीण तागड, मिरज चांदे हे ऑडीमधील नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना पारोळाच्या कुटीर रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. घटनेची महिती मिळताच लोणी, म्हसवे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.