शेवटी मृत्यूच्या खेळात कोणी मारली बाजी? सिंह करत होता बिबट्याची शिकार, पण तेवढ्यात झाला पलटवार.

बिबट्या आणि सिंहामध्ये झालं घनघोर युद्ध, शेवटी या युद्धात कोण जिंकलं? या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.सिंह हा किती खतरनाक शिकारी आहे, हे काही वेगळं सांगायला नको. वेळ आली तर तो एका भल्यामोठ्या हत्तीला देखील फाडून टाकू शकतो इतकी प्रचंड ताकत त्याच्याकडे आहे. सिंह शिकारीवर निघाला की अख्खं जंगल भितीनं थरथर कापतं. अन् म्हणूनच त्याला जंगलाचा राजा म्हणतात. पण याच राजाशी चक्क एक बिबट्या भिडला.

खरं तर हा सिंह बिबट्याची शिकार करत होता. पण बिबट्या सुद्धा अनुभवी शिकारी आहे. त्यानं सिंहावर जोरदार प्रतिहल्ला केला. शेवटी या युद्धात कोण जिंकलं हे आता तुम्हीच पाहा. या लढाईचा शेवट पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.जंगली शिकारी कधीही तुल्यबळ प्राण्यांवर हल्ला करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कारण लढाईमध्ये ते स्वत: सुद्ध जबरदस्त जखमी होण्याची शक्यता असते. अन् त्यामुळे ते नेहमी हरीण, झेब्रा, वनगाय यांसारख्या शाकाराही प्राण्यांची शिकार करतात. असो, पण हा सिंह मात्र फारच भुकेला दिसतोय. कारण त्यानं जंगलातील अलिखित नियम मोडला. त्यानं पोटाची आग विझवण्यासाठी बिबट्यावर झटप मारली. पण सिंहाचा दुदैव म्हणजे बिबट्या सुद्धा खतरनाक शिकारी आहे. त्यानं मोठ्या हुशारीनं सिंहाचा वार चुकवला.

सिंहानं आपल्या पूर्ण शक्तिनीशी बिबट्यावर हल्ला केला. त्यानं वाऱ्याच्या वेगानं आपले पंजे फिरवून बिबट्याला फाडण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्यानं वीजेच्या गतीनं सर्व वार चुकवले आणि शेवटी संधी मिळताच तो पळून गेला. सिंह कितीही चपळ असला तरी बिबट्या गर्द झाडीमध्ये लपण्यास पटाईत आहे. त्यामुळे शेवटी बिबट्याने या लढाईत बाजी मारली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असो, सिंहाचा हा पराभव पाहूनन तुमच्या डोक्यात कुठले विचार आले? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.