दुचाकी चोरट्याच्या एलसीबीच्या पथकाने आवळल्या मुसक्या; चोरीच्या चार दुचाकी हस्तगत

दुचाकी चोरट्याच्या एलसीबीच्या पथकाने आवळल्या मुसक्या; चोरीच्या चार दुचाकी हस्तगत

जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. यातच दुचाकी चोरुन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या एकाला एलसीबीच्या पथकाने अटक केलीय.गोपाल श्रावण तेली (वय ४२, रा. कळमसरा, ता. पाचोरा) असे या दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली दुचाकी गोपाल तेली हा संशयित वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकातील पोहेकॉ गजानन देशमुख, विनोद पाटील, विष्णू बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, राहूल महाजन या कर्मचाऱ्यांनी संशयित गोपाल तेली याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, या दुचाकीसह आणखी तीन दुचाकी आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार शहर, जिल्हापेठसह भुसावळ बाजारपेठ व चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. पुढील चौकशीसाठी संशयित गोपाल तेली याला शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.