सेल्फी ठरला अखेरचा! जळगावात दोन मित्रांना रेल्वेनं उडवलं, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

सेल्फी ठरला अखेरचा! जळगावात दोन मित्रांना रेल्वेनं उडवलं, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

जळगाव : नंदुरबारहून जळगावला आलेले दोघे मित्र गाडी आऊटरला थांबल्यामुळे रुळावरून पायी चालत रेल्वे स्टेशनवर येत होते. जळगाव थांबा नसलेल्या तुलसी एक्सप्रेसने त्या दोघे मित्रांना धडक दिली.यामध्ये ओम विजय वाघेला (वय २३, रा. राजकोट, गुजरात) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र समर्थ सुनिलसिंग रघुवंशी (वय २२, रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हे दोघे मित्र रेल्वे स्टेशनवर थांबवलेल्या मित्रांसोबत नाशिकला फिरायला जाणार होते. मात्र त्यापूर्वीच दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातली.

राजकोट येथील ओम वाघेला आणि समर्थ सूर्यवंशी हे दोघे मित्र नंदुरबार येथून रेल्वेने जळगावला आले. सुरतहून येणारी रेल्वे आऊटरला काही वेळ थांबली. बराच वेळ झाला तरी रेल्वे आऊटरला असल्यामुळे दोन्ही मित्रांनी रेल्वेतून उतरले आणि ते रेल्वे रूळ लगतच चालत रेल्वे स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावरच जळगावला थांबा नसलेल्या तुलसी एक्सप्रेसने रूळावरून चालणाऱ्या दोघा मित्रांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते दोघे मित्र रेल्वे रूळ लगत फेकले गेले.ओम व समर्थ हे दोन्ही मित्र बडोदा येथे एकाच महाविद्यालयात शिकायला होते. जळगावहून काही मित्रांसोबत ते नाशिकला फिरण्यासाठी जाणार होते. त्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर ओम व समर्थ यांचे काही मित्र त्यांना घ्यायला देखील आले होते. मात्र रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे त्या दोघांची मित्रांसोबत देखील भेट होऊ शकली नाही. ओम आणि समर्थ हे दोघे जळगावला येत असताना त्यांनी घटनेच्या काही मिनिटांपूर्वी सेल्फी काढून तो मित्रांसोबत शेअर केला होता. मात्र या दुर्देवी घटनेमुळे ओमसाठी हा सेल्फी अखेरचा ठरला असे म्हणत त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.