माझं गाव, १०० टक्के मतदान” अभियान.

माझं गाव, १०० टक्के मतदान” अभियान.

राष्ट्रीय सेवा योजना विभाग,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च,जळगाव व नशिराबाद नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४च्या अनुषंगाने “माझं गाव,१०० टक्के मतदान” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.याअंतर्गत विविध जनजागृती, साक्षरता व सेवा कार्यक्रम हे जिल्ह्याभरात राबविण्यात येत असून मुख्यत्वाने नशिराबाद नगरपरिषद भागात उपक्रमाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे.प्रत्येक मतदाराने मतदान करावे व मतदान टक्केवारी १००% व्हावी,असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. याअंतर्गत मतदारांसाठी विविध सेवा उपलब्ध करन्यात आलेल्या आहेत.पत्ता बदल, नाव बदल, वय किंवा पालक यामध्ये चूक,इ.कारणांमुळे मतदारपर्यंत त्यांची अद्ययावत मतदान माहिती पोहचवण्यात समस्या उदभवतात.परंतु निवडणूक आयोगाचे ध्येय आहे की एक ही मतदार मतदानापासून दूर राहू नये.त्यासाठी शेवटच्या मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.त्यासाठी नशिराबाद येथे मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.जेथे मतदारांच्या समस्या सोडवल्या जात आहेत.कार्यक्रमाची कालावधी 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर असून सुविधेसाठी ऑनलाइन व ऑनलाइन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून दररोज शेकडो मतदार याचा लाभ घेत आहेत. तसेच मतदार सेवेसाठी ‘मतदार दूत’ म्हणून रा.से.यो. स्वयंसेवक कार्य करीत आहेत.समाजातील विविध स्तरातून कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.

ऑफलाईन संपर्कासाठी मतदार सहाय्यता कक्ष,छत्रपती शिवाजी महाराज चौक,नशिराबाद येथे भेट द्यावी. ऑनलाइन संपर्कासाठी ७३८५६६४३७३ हा संपर्क क्रमांक २४×७ उपलब्ध आहेत. “मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे.व मतदारांची सेवा करणे,हे आमचे आद्यकर्तव्य आहे.आपण लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे व २० नोव्हेंबरला अवश्य मतदान करावे.”

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.