महावितरण औष्णिक वीज निर्मिती केंद्र मुख्य अभियंता यांचे स्वच्छ पर्यावरण साठी उपाय योजनात्मक प्रयत्न .

महावितरण औष्णिक वीज निर्मिती केंद्र मुख्य अभियंता यांचे स्वच्छ पर्यावरण साठी उपाय योजनात्मक प्रयत्न .

भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे ;भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र मध्ये पर्यावरण संतुलन करीता अधिकारी आणि पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी व सचिव प्राध्यापक के पी चौधरी यांनी पर्यावरण संतुलन बाबत संयुक्त पाहणी केली . दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता बदाने साहेब उपमुख्य अभियंता रवींद्र सोनकुसरे व ॲशहँडलिंग च्या बाबतीमध्ये काम करणारे अधिक्षक अभियंता चंद्रमणी व इतर सर्व अधिकारी सह संपूर्ण इपीपीओ पदाधिकारी यांनी संयुक्त पाहाणी केली . महावितरणच्या पर्यावरण संरक्षणात त्रुटी आढळली,

प्रामुख्याने पाण्यासोबत जाणारी राखेची पाईपलाईन त्यावर बसवलेले व्हॉल्व आणि परिसरामध्ये या व्हॉल्व द्वारे सोडण्यात येणारी राख आणि त्यातून होणारे प्रदूषण याबाबत संपूर्ण माहिती घेतली . साहेबांनी संयुक्त पाहणी केली आणि संयुक्त पाहाणी मध्ये भोगावती , वेल्हाळा नदीचे प्रमुख स्त्रोत मोहम्मद पुरा नाला , जांभूळ नाला तसेच कीन्ही नाला या तीनही मध्ये मोठ्या प्रमाणात राख आहे . तलावाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये राख मिसळत असते . या ठिकाणी गावाच्या पिण्याच्या पाण्याचे योजना आहेत . वेल्हाळे पिण्याच्या पाण्याचे योजना तिथे विहीर आहे . तिथे राख मोठ्या प्रमाणात मिसळत असते वाटर रिक्वेरी मधून राखेचे पाणी विहिरीद्वारे येत असतं आणि परिसरामध्ये राखेचे पाणी पसरत असतं ही संपूर्ण माहिती पाहाणी करून मुख्य अभियंता बदाणे यांनी केली आणि त्या पाहणी सोबत त्यांनी प्रदूषणाच्या रोखण्याच्या बाबत मक्तेदार व्यवस्थितपणे काम करत नाही त्यामुळे त्याला लेखी समज दिली आहे .

राख वाहतूक करताना ट्रॅक्टर किंवा ट्रक कुठेही नियमाचे पालन करत नाही .राखेचे डोंगरा सारखे मोठे साठे या परिसरामध्ये संयुक्त पाहाणीत आढळले . प्रदूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये , सिंचनाच्या पाण्याच्या स्त्रोतांम मध्ये मिसळता कामा नये याबाबत संस्थे कडून वरिष्ठांकडे माहिती कळवली जाईल . विहिरीद्वारे फिल्टर पाणी परिसरामध्ये नागरीकांना पिण्यास मिळाले पाहिजे प्रदूषण नियंत्रणासाठी काम करण्याची साहेबांनी इच्छा व्यक्त व्यक्त केली असून लवकरात लवकर निर्णय घेवून अंमलबजावणी केली जाईल . महत्वाच्या उपाय योजना आपल्या ईपीपीओ सोसायटीने सुचवलेल्या आहे त्याप्रमाणे अंमलबजावणी गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे अपेक्षित आहे . एकुण या संयुक्त पाहाणी फेरीत सर्व समस्यावर प्रभावी उपाय योजना करून प्रकल्प बाधित गाव परिसरातील नागरीकांना दिलासा द्यावा असे इपीपीओ संस्थेचे अध्यक्ष पर्यावरण अभ्यासक माजी जि.प . सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी यांनी समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त केले .

पर्यावरण तज्ज्ञ के.पी चौधरी यांनी सांगितले की ॲश बंड मुळे भोगावती , वेल्हाळा नदी यांना मिळणारे छोटे मोठे महमदपूरा ‘ किन्ही तसेच जांभुळ नाला सतत स्वच्छ प्रवाहीत होण्यासाठी काळजी घेणे याप्रसंगी महत्वाची गरज आहे सांगितले . सकारात्मक विचारातून उपाय योजनांचे अश्वासन देत एक दिवसीय दौरा संपन्न झाला .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.