काहींना दारू पाजून गोंधळ घालण्याचा केला जातोय निंदनीय प्रयत्न, एवढ्या खालच्या स्तरावर जाऊ नका,जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांचा इशारा

काहींना दारू पाजून गोंधळ घालण्याचा केला जातोय निंदनीय प्रयत्न, एवढ्या खालच्या स्तरावर जाऊ नका,जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांचा इशारा

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील- अमळनेर -विधानसभा मतदारसंघातील काहीं गावात टवाळ खोरांना दारू पाजून गोंधळ घालण्यास प्रवृत्त करण्याचा निंदनीय प्रकार केला जात असल्याने एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन आपलीच वाहवाह करून घेऊ नका,खिलाडू वृत्तीने लढा देण्याची तयारी ठेवा अन्यथा आम्हालाही सर्वच खेळ येतात असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांनी विरोधी उमेदवारास उद्देशून दिला आहे.
सद्यस्थितीत ग्रामिण भागात उमेदवारांचा प्रचार दौरा सुरू असुन उमेदवारासमोर गोंधळ घालण्यासाठी दारू वाल्या उमेदवारांकडून दारु चा डोस देऊन सोबत वेगवेगळे प्रलोभन देखील दाखवले जात आहे.काही बिनबुद्धीचे यास बळीही पडत असल्याने काही चुकीचे प्रकार होत आहेत.असेच प्रकार ही मंडळी करणार असेल तर त्यांनाही इतर गावात असाच गोंधळ अनुभवयला मिळाल्यास वाईट वाटून घेऊ नये.

आम्ही लोकशाहीच्या मार्गांने निवडणूक लढविणारे असल्याने आमचे महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांचा मार्गाने निवडणूकीच्या रिंगणात असून ग्रामिण भागात प्रत्येक गावात त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेला प्रचंड विकास हेच त्यांच्या विजयासाठी पुरेसे असणार आहे. मात्र गोंधळ घालणाऱ्यानी फक्त दारु मिळते म्हणून आपल्या तालुक्याची आणि मतदारसंघाची प्रतिमा कलंकित करू नये.आणि विरोधी उमेदवारांनी देखील आपल्या स्वार्थासाठी भरकटलेल्या तरुणाईला व्यसनाधीन करून अशी वाईट प्रवृत्ती आमच्या मतदारसंघात मुळीच रुजवू नये अन्यथा डाव उलटवायला वेळ लागणार नाही असा इशारा भदाणे यांनी दिला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.