मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड. विकास कामांच्या रूपाने केल्याने जनता समाधानी.

अमळनेर-विधानसभा मतदारसंघातील मुंडी मांडळ जि. प.गटात मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड विकास कामांच्या रूपाने केल्याने जनता समाधानी झाली असल्याची माहिती भाजपा चे जिल्हा सरचिटणीस तथा अमळनेर प.स.चे उपसभापती भिकेश पावभा पाटील यांनी दिली.


गटातील विकास कामांसंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की गावोगावी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना असेल सामाजिक सभागृह असेल,, गावा-गावाना जोडणारे दर्जेदार रस्ते, स्वागतसाठी आकर्षक व सुंदर असे प्रवेशद्वार, शुद्ध पाण्यासाठी आर.ओ. फिल्टर प्लांट, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय इमारती असतील,,गाव अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणं असेल, संरक्षण भिंत, पादचारी पूल असेल,, स्मशानभूमी व सांत्वनशेड असेल, बालगोपालासाठी अंगणवाडी व शाळा इमारती, शाळा संरक्षण भिंत, शाळा डिजिटल साहित्य, तरुणाईसाठी अभ्यासिका, व्यायाम शाळा व व्यायाम साहित्य असेल,,दलित व भिल्ल वस्तीत विविध विकासकामे, स्मारक व चौक सुशोभीकरण असतील,,शेत-शिवार रस्ते असतील,, तीर्थक्षेत्र व रोजगार हमी अंतर्गत विकामकामे, आरोग्य उपकेंद्रासाठी विविध आरोग्य साहित्य पुरवठा, अल्पसंख्याक समाजासाठी विविध विकासकामे, नवीन विद्युत डीपी, पोल, तारा असतील असे एक गाव नाही जेथे भूमीपुत्र अनिलदादा चे विकास काम नाही. पांझरा नदीचे पाणी वाहून जाऊ नये यासाठी शहापुर, बाम्हणे येथे बंधारे टाकून पाणी अडवले गेल्याने या परिसरातील गावामधील शेतकरी राजास सुखी व समृद्ध होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही हा आमचा विश्वास आहे.मुडी येथील फड बंधारा देखील याच भूमीपुत्राने पुनर्जीवित करून त्यासोबतच मांडळ येथील ब्रिटिश कालीन कालवा देखील पुनर्जीवित करून पांझरेचे पाणी लवखी व भाला नाल्यात टाकण्याच्या योजनेचा शुभारंभ केल्याने व लवखी नाल्यावर विविध बांध-बंधाऱ्यामुळे सुमारे 20 ते 22 गावांना ही एक अनमोल भेट आहे,,,


विकासात्मक दृष्टी असलेले अनिल पाटील हे आमचे महायुतीचे उमेदवार असल्याने आणि आमच्या परिसरात भाजप विचारांचे अधिक प्राबल्य असल्याने अनिल दादांसाठी अतिशय पूरक असे वातावरण असून जनता निश्चितच भरभरून मतदान त्यांच्या पारड्यात टाकून राज्यातील भाजप पक्षश्रेष्ठींचे हात बळकट करेल असा विश्वास ही भिकेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

  • Related Posts

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद जळगाव पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका…

    अजित पवार महायुतीत नसते तर… गुलाबराव पाटील असं का म्हणाले

    अजित पवार महायुतीत नसते तर… गुलाबराव पाटील असं का म्हणाले जळगाव : अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आमच्या महायुतीत नसता तर आम्ही शिवसेना शिंदे गटाने शंभर जागा जिंकल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!