पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात

रणगाव/जळगाव दि. 30 – जळगावच्या मातीचा सुगंध अनुभवणारे आणि जनतेच्याहृदयात कोरलेले गुलाबराव पाटील यांच्या प्रचार्थ त्यांचे दोन पुत्र व शेकडो युवकांना सोबत घेवून गावो- गावच्या प्रत्येक गल्लीतून ही दोन भावंडं जनतेच्या मनातल्या आशा-आकांक्षांना चेतवतात. “गुलाबराव पाटील हे केवळ आमचे वडील नाहीत, ते या मतदार संघाचे भूमिपुत्र असून त्यांनी केलेल्या विकास कामांसाठी आपले आशीर्वाद व खंबीर साथ द्यावी अशी भावनिक साद ते घालत आहेत. विकासाच्या ध्येयाशी जोडलेली ही भावनिक साद मतदारांच्या हृदयात नवी उर्जा आणि नवीन अशा निर्माण करत असल्याचे प्रत्येक गावातून जनतेच्या मिळालेल्या दिसून येत आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व लघुउद्योजक विकी बाबा – पाटील या दोन भावंडांचा तीन दिवसात चांदसर , दोनगाव बु., टहाकळी, आव्हाणी, भोकणी, पथराड बु. पथराड खु., लाडली फुलपाट पाळधी बु. पाळधी खु.,धार, शेरी, कवठळ, दुसखेडा, एकलग्न, पोखरी तांडा, दोनगाव खु. झुरखेडा, निमखेडा, तारखेडा सह इतर 22 गावांमध्ये झंझावाती प्रचार करून मतदाराशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी गुलाबराव पाटील यांना आशीर्वाद देऊन भक्कम पाठबळ असल्याची ग्वाही दिली. धनुष्यबाण व गुलाबराव पाटील व नेत्यांचे लहान मोठे कट – आउट, भगवे रुमाल, टोप्या व मुखवटे यांचा उपयोग केल्याने प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. प्रचार रॅलीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.