तळई ,उत्राण गटांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका एरंडोल पक्षाची महत्वपूर्ण बैठक

* भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित असणाऱ्या
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षांच्या बैठकीत महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

एरंडोल प्रतिनिधी –एरंडोल – दि १९ /१०/२०२४ रोजी तळई ,उत्राण गटांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका एरंडोल पक्षाची महत्वपूर्ण बैठक जळगाव जिल्हाध्यक्ष आनंद खरात साहेब यांच्या आदेशाने घेण्यात आली. सदहु बैठकीत एरंडोल, पारोळा, भडगाव विधानसभा मतदारसंघ महायुती मध्ये रिपब्लिकन पक्ष मित्र असलेल्या महायुती चे लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी भेट घेऊन मतदार संघातील समस्या वर चर्चा लेखी पत्र देऊन ही रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना गेल्या पाच वर्ष कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी चा सुर एकमताने उमटलेला आहे. व होणाऱ्या एरंडोल ,पारोळा, भडगाव विधानसभा मध्ये महायुतीचे उमेदवार यांना कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचे एकमताने ठरविण्यात आलेले आहे.

महायुती चे उमेदवाराचे निवडणूक प्रचार, सभा रॅली मध्ये वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत रिपब्लिकन पक्ष एरंडोल तालुक्यात निवडणूक कामी सहभागी होणार नाहीत. प्रचार सभा व बैठका घेणार नाहीत. असे बैठकीत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कळविण्यात आलेले आहे.असे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल  खोकरे यांनी जाहीर केले असून त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव केला आहे. एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण  बाविस्कर तसेच तालुका सचिव देवानंद  बेहेरे यांनी आपली नाराजी व्यक्त करून महायुतीचे उमेदवाराचे निवडणूक प्रचारावर तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी बैठकीत उपस्थित संघटक देविदास जाधव, एरंडोल तालुका सरचिटणीस जैनुल शेख पत्रकार, उपाध्यक्ष बंडु पाटील, कासोदा शहर अध्यक्ष जितेंद्र वाघ, भाऊसाहेब पानपाटील, एरंडोल तालुका महिला आघाडी अध्यक्षा माया खैरनार, सुभाष जाधव, किरण पानपाटील, आनंद सूर्यवंशी, आबा पाटील, राहुल बाविस्कर, महीला आघाडी तालुका सचिव सुनिता भोई, लता कोळी, उषा पाटील, माधुरी  पाटील, अरूणा कोळी, संगिता सोनवणे, सोनाली कोळी, ज्योती पांडे, सुनंदा भोई, तालुका सचिव महीला आघाडी , सुरेखा  घोडेस्वार,रशिद मिस्तरी, बशीर शेख, जुबेर शेख,जैद शेख,साद शेख,राजू अहिरे, रुपाली पाटील,छाया भोई, संगिता खैरनार,राम लोहरे, पिंटू वंडर, संतोष सोनवणे,भाऊलाल सोनवणे, दिपक जाधव मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.