शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून वंचित; अमळनेर तालुका कृषी कार्यालयात दांगडो

शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून वंचित; अमळनेर तालुका कृषी कार्यालयात दांगडो

मळनेर : कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाई व कर्तव्यात कसुरीमुळे अमळनेर तालुक्यातील सुमारे १३५ शेतकरी एक कोटी ३५ लाख रुपयांच्या ठिबक अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दांगडो केला. शासनाकडून अमळनेर तालुक्यासाठी ४९४ शेतकऱ्यांसाठी चार कोटी ४६ हजार रुपये अनुदान मंजूर होते. मात्र, अमळनेर तालुक्यातील कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक गणेश पाटील आणि सागर चौधरी यांच्या आपसातील वादामुळे वरिष्ठ पातळीवर याद्याच गेल्या नसल्याने सुमारे १३५ शेतकरी वंचित राहिले. ३५९ शेतकऱ्यांना दोन कोटी ३५ लाख १९ हजार ९५५ रुपये अनुदान मिळाले. वेळेवर याद्या न गेल्याने १३५ शेतकऱ्यांचे एक कोटी ६५ लाख २६ हजार ४५ रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकरी संतप्त होऊन तालुका कृषी कार्यालयावर धडकले. त्यांनी कृषी अधिकाऱ्याला जाब विचारला. या वेळी कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या चुकीची माफी मागितली. मी तुमचा प्रस्ताव पाठवतो.

त्यावेळी शेतकऱ्यांनी साहेब आचारसंहिता सुरू आहे आणि सरकारने इतक्या योजना मंजूर करून ठेवल्या आहेत, तर अनुदान कसे मिळेल, असे सांगितले. संदीप पाटील, संजय पवार, बाबूलाल पाटील, सुनील पाटील, मधुकर पाटील, जितेंद्र पाटील, कैलास पाटील, श्रीपाल झाबक, दिनेश पाटील, सुधीर पाटील, योगेश पाटील, बापूराव महाजन, चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निंबा पाटील, उमेश साळुंखे, योगेश पाटील, विकास जाधव, हेमंत पाटील हजर होते.

”कर्मचाऱ्यांची थोडी चूक आहे. मात्र, नंतर प्रस्ताव पाठवून जादा अनुदान मागवून उर्वरित शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न असेल.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.