चाळीसगावात महाविकास आघाडीत बिघाडी, उन्मेष पाटील यांची उमेदवारी धोक्यात?

चाळीसगावात महाविकास आघाडीत बिघाडी, उन्मेष पाटील यांची उमेदवारी धोक्यात?

चाळीसगावात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांना पक्षाकडून चाळीसगाव विधानसभेतून उमेदवारी जाहीर करत एबी फॉर्म दिल्याची माहिती पाटील यांच्या कुटुंबियांनी  दिली. यानंतर चाळीसगाव विधानसभेच्या जागेवरून आता शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये वाद बघायला मिळत आहे. चाळीसगावातील शरद पवार गटाचे माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. “चाळीसगाव विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीच आहे. माजी आमदार राजीव देशमुख यांनी माझ्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. चाळीसगाव विधानसभेची जागा मी लढवावी यासाठी मला आग्रह केलेला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. चाळीसगाव विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाच मिळेल”, अशी भूमिका प्रमोद पाटील यांनी मांडली आहे.

प्रमोद पाटील यांचा नेमका दावा काय?

माहिती मिळाली की, उन्मेष पाटील एबी फॉर्म घेऊन आले. अजून जागा वाटपाची घोषणाचं नाही तर उन्मेष पाटील एबी फॉर्म कसं काय घेऊन आले? याचं आम्हाला आश्चर्य वाटत आहे. उन्मेष पाटील यांच्या परिवारातील सदस्यांनी भूमिका मांडली की, आम्ही राजू देशमुखांचे आभार मानतो. पण राजीव देशमुख ही जागा माझ्यासाठीच मागत आहेत”, असं प्रमोद पाटील म्हणाले. बातमी ऐकल्यानंतर आम्ही सर्वजण मुंबईला जायला निघालो आहोत. चाळीसगाव विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच मिळावी ही भूमिका माजी आमदार राजीव देशमुख यांची स्पष्ट आहे. असं असताना अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणे याचं मला मोठं आश्चर्य वाटत आहे. चाळीसगाव विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीचीच आहे एवढेच मी या निमित्ताने सांगतो”, असं शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.