जळगाव जिल्ह्यात कोणा-कोणामध्ये असणार लढत? जाणून घ्या प्रत्येक उमेदवाराचा परिचय

जळगाव जिल्ह्यात कोणा-कोणामध्ये असणार लढत? जाणून घ्या प्रत्येक उमेदवाराचा परिचय

 

जळगाव ग्रामीण : गुलाबराव पाटील (शिवसेना)

कार्यपरिचय

शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर आमदार गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटात सामील झाले. लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वात भाजपला मताधिक्य मिळाले आहे.

शिवसेनेचा राज्यातील दमदार चेहरा, मुलुखमैदान तोफ म्हणून लौकिक प्राप्त असून, विरोधकांना अंगावर घेण्याची वृत्ती आहे. पालकमंत्री म्हणून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे. कार्यकर्त्यांचे नेटवर्क, संपर्क दांडगा ही त्यांची जमेची बाजू आहे.

उमेदवारीची कारणे :

– शिवसेनेमधील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी नेते.

– पालकमंत्री असल्याने इतर मतदारसंघातही विजयासाठी योगदान.

– कार्यकर्त्यांचे जाळे, दांडगा जनसंपर्क.

– मतदारसंघात सर्वत्र विकासकामे केल्याने मतदारांमध्ये प्रभाव.

– मुलूखमैदान तोफ, सभागृहात प्रभावी मांडणी

आव्हाने :

-अनेक वर्षांपासून न सुटलेला धरणगाव शहराचा पाणीप्रश्न

– अनेक वर्षांपासून रखडलेले बालकवींचे स्मारक

– धरणगावातील क्रीडा संकुलाचे बांधकाम

– अनेक वर्षांपासून उद्योगांविना धरणगावची एमआयडीसी

– उद्योग नसल्याने स्थानिक बेरोजगारांचा प्रश्‍न

————————

पाचोरा-भडगाव : किशोर पाटील (शिवसेना)

कार्यपरिचय :

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार किशोर पाटील हे शिंदेंसोबत गेले. मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क आहे. विकासकामे मोठ्या प्रमाणात केले असून, पक्षांतर्गत कुणीही स्पर्धक नाही, ही जमेची बाजू आहे. विरोधकांना मात देण्याची क्षमता आहे. सलग दोन टर्ममधील प्रभावी काम केल्याने जनतेत दबदबा आहे. किशोर पाटील यांनी सुमारे दोन हजार मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला होता.

उमेदवारीची कारणे :

– मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात विकासकामे.

– रस्ते, मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला.

– सलग दोन टर्मपासून प्रभावी काम.

– कार्यकर्त्यांची तळागाळात मजबूत फळी.

– पक्षांतर्गत कुणीही विरोधक नाही.

आव्हाने :

– आमदार किशोर पाटील शिंदे गटात गेल्याने विरोधकांची टिका.

– बहीण भावातच फूट पडल्याने वैशाली सूर्यवंशींचे किशोर पाटलांसमोर आव्हान

– माजी आमदार दिलीप वाघ यांचीही निवडणूक लढविण्याची तयारी

– अपक्षांची संख्या अधिक असल्याने बहुरंगीच लढत

– अद्यापही कार्यान्वित न झालेली शासकीय ‘एमआयडीसी’

एरंडोल-पारोळा : अमोल चिमणराव पाटील (शिवसेना)

कार्यपरिचय :

आमदार चिमणराव पाटील प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. पक्षाने त्यांच्याऐवजी पुत्र अमोल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. युवा आश्‍वासक चेहरा व कोरी पाटी असल्याने अमोल पाटील यांचा तरुणांमध्ये प्रभाव आहे. शिवाय, मतदारसंघांत चांगला जनसंपर्क आहे. पित्याची खंबीर साथ लाभल्याने अनुभवाची शिदोरी. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा. विकासकामांसह मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणल्याने फायदा झाला. तसेच पक्षांतर्गत स्पर्धक नसल्याची जमेची बाजू आहे.

उमेदवारीची कारणे :

– आमदार पित्याची खंबीर साथ

– मतदारसंघात चांगला जनसंपर्क

– पक्षांतर्गत पर्यायी स्पर्धक नाही

– युवा, कोरी पाटी असलेला चेहरा

– मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कामे

आव्हाने :

– आमदार पाटील यांनी मुलालाच उमेदवारी दिल्याचा मुद्दा.

– ग्रामीण रस्ते, मूलभूत सुविधा आदी प्रश्‍न.

– माजी पालकमंत्री पाटील यांच्या लढतीची शक्यता.

– बेरोजगारी, उद्योग उभारणीची गरज

– अपक्षांची वाढती संख्या अडचणीची

कार्यपरिचय :

मतदार संघात विकासकामांचा दावा केला जात असून, स्वत:सोबत विद्यमान आमदार असलेल्या पत्नी लता सोनवणे यांचा जनसंपर्क, जमेची बाजू आहे. मतदार संघांत विरोधकांना मात देण्याची क्षमता व प्रभाव आहे. तसेच माजी आमदार म्हणून वेगळी ओळख आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारण्यात यशस्वी ठरल्याने मजबूत फळी निर्माण केली आहे.

उमेदवारीची कारणे

– माजी आमदार म्हणून ओळख

– मतदारसंघात विकासकामांचा दावा

– पक्षांतर्गत पर्यायी स्पर्धक नाही

– स्वत:सोबतच पत्नीचा दांडगा संपर्क

– विरोधकांना मात देण्याची क्षमता

आव्हाने :

– तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था.

– सोशल मीडियावरील रस्त्यांबाबतची पोस्ट.

– मतदारसंघाबाहेरून आयात केलेला उमेदवाराचा मुद्दा

– मतदारसंघातील गावांमधील जनतेपर्यंतचा संपर्क

– उमेदवारी न मिळालेले इच्छूक डोकेदुखी वाढविणार

——————–

मुक्ताईनगर : चंद्रकांत पाटील (शिवसेना)

कार्यपरिचय :

मतदारसंघ माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडून हिसकावून घेत गतवेळी अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी मारली बाजी. स्थानिक कार्यकर्त्यांची भरभक्कम फळी, सामाजिक समीकरणाचा लाभ. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना बंडाच्या वेळी साथ दिल्याने त्याचा फायदा झाला. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध, विकासनिधी आणण्यासाठी मोलाचे ठरले.

उमेदवारीची कारणे :

– स्थानिक कार्यकर्त्यांची साथ

– सामाजिक समीकरणाचा लाभ

– खडसेंना थेट भिडण्याची वृत्ती

– मुख्यमंत्र्यांना बंडाच्या वेळी साथ

– मंत्री गिरीश महाजनांशी चांगले संबंध

आव्हाने :

– ॲड. रोहिणी खडसेंचे आव्हान.

– सरळ लढतीपेक्षा बहुरंगी लढतीचीच शक्यता.

– वर्षानुवर्षे रखडलेले बोदवड उपसा योजनेचे काम.

– तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळूनही तालुका वंचित.

– चंद्रकांत यांची स्वार्थासाठी बदललेली भूमिकेचा मुद्दा.

———————

चाळीसगाव : उन्मेश पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

कार्यपरिचय :

चाळीसगाव मतदारसंघातून २०१४ ला भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले. पाच वर्षांनंतर २०१९ ला त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. २०२४ ला त्यांना उमेदवारी अपेक्षित असताना त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे त्यांनी शिवबंधन हाती बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. लोकसभेला त्यांचे मित्र तथा उमेदवार करण पवार यांच्या पाठिशी उभे राहिले. आता त्यांना चाळीसगाव विधानसभेसाठी उद्धव ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे.

उमेदवारीची कारणे :

– माजी आमदार, माजी खासदार म्हणून

– चाळीसगाव मतदारसंघात संपर्क

– मंत्री गिरीश महाजनांशी भिडणारे नेतृत्व

– युवा, उच्च शिक्षित उमेदवार म्हणून निवड

– खासदारकीच्या वेळी केलेली कामे

आव्हाने :

– भाजपतून पक्षांतर केल्याचा परिणाम

– प्रतिस्पर्धी मंगेश चव्हाणांची लोकप्रियता

– मतदारसंघात पक्षाचे केडर मजबूत नाही

– व्यक्तिगत संबंधांवरच मदार

– व्यक्तिकेंद्रीत राजकारणाची सवय

पाचोरा : वैशाली सूर्यवंशी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

कार्यपरिचय :

वैशाली सूर्यवंशी या माजी आमदार (स्व.) आर.ओ. पाटील यांच्या कन्या तर विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या चुलत भगिनी आहेत. किशोर पाटील शिंदेंसोबत गेल्यानंतर त्या ‘उबाठा’ पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. आर.ओ. पाटलांचा समृद्ध वारसा असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी उभ्या केलेल्या निर्मल उद्योग समुहात त्या संचालिका आहेत.

उमेदवारीची कारणे :

– कोरी पाटी असलेल्या उमेदवार

– स्व. आर.ओ. पाटलांचा वारसा

– मतदारसंघात चांगली प्रतिमा

– मतदारसंघात शिवसेनेचे सक्षम केडर

– महिला उमेदवार म्हणून संधी

आव्हाने :

– राजकारणात नवख्या उमेदवार

– प्रतिस्पर्धी उमेदवाराचा मोठा अनुभव

– पक्षाचे केडर योग्यरित्या वापरणे

– कमी कालावधीत मतदारसंघ व्यापणे

– कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेणे

——————–

अमळनेर : अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

कार्यपरिचय :

अनिल भाईदास पाटील २०१९ला अमळनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. त्याआधी २००९मध्ये भाजपकडून तर २०१४ला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्या दोघा वेळी त्यांचा पराभव झाला. २०१९ला मात्र त्यांनी भाजप उमेदवारी व तत्कालीन आमदार शिरीष चौधरींना पराभूत केले. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.

उमेदवारीची कारणे :

– पक्षांतर्गत स्पर्धक कुणीही नाही

– मंत्री म्हणून मतदारसंघातील कामे

– मतदारसंघात मोठा जनसंपर्क

– पाडळसरे प्रकल्प ‘सुप्रमा’साठी केलेले प्रयत्न

– अजित पवारांचे निष्ठावान निकटवर्तीय

आव्हाने :

– पक्ष कार्यकर्त्यांच्या केडरचा अभाव

– पक्ष फोडण्याबाबत विरोधकांकडून टीका

– व्यक्तिगत यंत्रणेवरच प्रचार अवलंबून

– कामाच्या शैलीमुळे वाढलेले विरोधक

– शरद पवारांच्या टार्गेटवर मतदारसंघ

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.