जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; मृत भुसावळचा रहिवासी

जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; मृत भुसावळचा रहिवासी

येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिक्षण घेणारा हर्शल सुधाकर सोनवणे (वय १७, रा. दादावाडी) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २१) घडली. मात्र, हर्शलने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  भुसावळ येथील मूळ रहिवासी असलेला हर्शल शिक्षणासाठी जळगावच्या दादावाडी परिसरातील मामांकडे वास्तव्यास होता. त्याची आई शिक्षिका व वडील खासगी कंपनीत नोकरीस आहेत. हर्शल शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिक्षण घेत होता.

सोमवारी दुपारी घरी एकटाच असताना, हर्शलने दुसऱ्या माळ्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच, त्याने तत्काळ हर्शलला खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यास जिल्‍हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथे हर्शलला तपासले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच त्याच्या कुटुंबियांसह नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबीयांनी हर्शलचा मृतदेह बघताच केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावणारा होता. त्याच्या मागे आईवडिल व आजी असा परिवार आहे. या घटनेनंतर त्याच्या महाविद्यालयात व तो राहत असलेल्या परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.