शिवसेनेकडून पाचही जागांवर उमेदवार जाहीर! पालकमंत्र्यांसह दोन आमदार, एक माजी आमदाराचा समावेश

शिवसेनेकडून पाचही जागांवर उमेदवार जाहीर! पालकमंत्र्यांसह दोन आमदार, एक माजी आमदाराचा समावेश

उमेदवारी जाहीर करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने त्यांच्या वाट्याच्या जळगाव ग्रामीणमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह, पाचोरा, एरंडोल, चोपडा व मुक्ताईनगर सर्व पाच जागांवर उमेदवार जाहीर केले. शिवसेनेने मंगळवारी (ता. २२) रात्री उशिरा जळगाव ग्रामीणमधून पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोऱ्यातून आमदार किशोर पाटील, एरंडोल मतदारसंघातून आमदार चिमणराव पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अमोल चिमणराव पाटील यांना, तर चोपड्यातून विद्यमान आमदार लता सोनवणे यांच्याऐवजी त्यांचे पती तथा माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, तर मुक्ताईनगरातून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

शिवसेना (उबाठा) पक्षाकडून पाटील, सूर्यवंशी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुधवारी (ता. २३) चाळीसगावमधून उन्मेष पाटील, तर पाचोऱ्यातून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी घोषित केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मंत्री पाटलांना उमेदवारी

राष्ट्रवादी कॉंग्रेसने अमळनेर मतदारसंघातून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने यापूर्वीच पाचही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.