खानदेश क्रांती शेतकरी संघटनेतर्फे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

खानदेश क्रांती शेतकरी संघटनेतर्फे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसाने व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी यांना खानदेश क्रांती शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्रपरतीच्या पावसाची अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे, हाताशी आलेली कपाशी वाया गेली, मक्का पूर्णपणे खराब झाला ज्वारी बाजरी काळ पडू लागल्यात उडीद मूग तर हातचे गेले असता पपई पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी मायबाप सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देणार का आता आधारसहिता लागली असून प्रशासनावरच याची जबाबदारी येऊन ठेपली आहे संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी हवालदील झाला असून प्रशासनाने तात्काळ पंचनामांचे घोडे न नाचवता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पावले उचलली पाहिजे सततच्या ओला किंवा कोरडा दुष्काळामूळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून मागच्या वर्षाचे ही पीक विम्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत

तसेच शेतकल्पांसाठी पाच हजार रूपये दुष्काळी अनुदान म्हणून सरकारने देण्याची घोषणा केली त्यातही 50 60 टक्क शेतकन्यांना पैसे मिळालेले नाहीत फक्त केवायसीच्या नावाखाली घोडे अडवून ठेवले आहे, तसेच आता तात्काळ शेतक-यांना 25% पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी तसेच पिक विमा बैंकांमध्ये होणारी शेतकऱ्यांची गळचीपी नुकसान भरपाईत पारदर्शकता व इतर शेतक-यांच्या अडीअडचणीसाठी जिल्हास्तरावर तात्काळ समिती गठन करण्यात यावी यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनास निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे, निवेदनावर जितेंद्र पाटील, बिपीन पाटील, रवींद्र वळवी, प्रमोद पाटील, राजेंद्र बुवा, बाळासाहेब मोरे, योगेश पाटील, सागर पाटील, विरपाल गिरासे, मनोज चौधरी, प्रतीक पाटील, प्रणव पाटील, स्वप्नील पाटील, संदीप पाटील, उमाकांत पाटील, निलेश ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.