पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघामधून आमदार किशोर पाटलांना तिसऱ्यांदा मिळालं तिकीट

पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघामधून आमदार किशोर पाटलांना तिसऱ्यांदा मिळालं तिकीट शिवसेना शिंदे गटाची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर.

भडगाव तालुका प्रतिनिधी : यशकुमार पाटील. पाचोरा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये ४५ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाचोऱ्यातून विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याआधीच आमदार किशोर आप्पांनी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केल्यानुसार उद्या २४ ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगल जात आहे.

गेल्या दहा वर्षांपासून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील करत आहेत. याठिकाणी मागच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेले आणि आता सध्या भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे देखील भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने ही जागा नेमकी कुणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, शिवसेनेने आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा संधी देत रात्री त्यांच्या नावासह एकूण ४५ उमेदवारांची घोषणा केली. दरम्यान, आमदार किशोर पाटील हे आता आमदारकीच्या हॅट्रिकसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.