भडगाव तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा.

भडगाव तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा भडगाव तहसिलदारांना शेतकरी संघटनेचे निवेदन.

भडगाव : तालुक्यात दोन महिन्यापासुन अतिवृष्टी सारखा पाऊस बरसत असुन गेल्या आठ दिवसापासुन परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या खरीप हंगामाच्या शेती पिकांचा घास हिरावुन गेलेला आहे. कापुस, मका, ज्वारी, सोयाबीन इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी भडगाव तालुक्यात पिक नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावे. तसेच भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दयावा. या मागणीचे निवेदन भडगाव शेतकरी संघटने मार्फत भडगाव तहसिल कार्यालयाचे नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे यांना देण्यात आले.
निवेदनात नमुद केले आहे कि,

यावर्षी खरीप हंगाम बरा येईल अशी आशा होती. तसेच मागील वर्षा सारख्या दुष्काळाच्या झळा आता बसणार नाहीत. अश्या आशेने शेतकऱ्यांनी शेतात बऱ्यापैकी भांडवल उभे करुन खर्च केला. जीवाचे रानं करुन खरीपाचा शेती हंगाम फुलविला. आणि ऐन शेतीचा माल आता घरात येईल. व कापसाला चांगला भाव मिळेल. हे साल चांगले जाईल. या आशेवर असतानाच ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या परतीच्या पावसाने बिचाऱ्या बळीराजाच्या हातात आलेल्या मालाचे डोळ्यात देखत लाखोंचे नुकसान झाले आहे. कापूस, मका, तुर, सोयाबीन, ज्वारी बाजरी ही पिके हातची गेली आहेत. त्यासाठीच शेतकरी संघटनेने भडगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन सरसकट पिक नुकसानीचे पंचनामे करून भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. यासंबंधीची निवेदनाने प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिक नुकसानीबाबतच्या संकटाबाबत व शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ पिक नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. तसेच भडगाव तालुका ओला दुष्काळी जाहीर करावा. शासनाकडुन भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त व संकटात सापडलेल्या शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदतीचा हात दयावा. आमच्या भावना शासनदरबारी पोहचवण्यात याव्यात. याबाबत भडगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अखिलेश पाटील यांचेसह संघटनेच्या पदाधिकार्यांनी नायब तहसिलदार राजेंद्र अहिरे यांच्याकडे व्यथा मांडत मागणी मांडली. या निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अखिलेश पाटील, वाल्मीक लोखंडे, सरदार सिंग पाटील, लक्ष्मण बोरसे, भिला महाजन, भगवान महाजन, अक्षय पाटील,अशोक परदेशी, अमोल पाटील, घनश्याम पाटील आदिंच्या सहया असुन निवेदन देतांना सर्वजण उपस्थित होते.

प्रतिक्रीया :- भडगाव तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची अक्षरशा वाट लावलेली आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावला गेला आहे. कपाशी, तुर, सोयाबीन, ज्वारी, मका, बाजरी यासह शेती पिकांचे पुर्णता नुकसान झाले आहे. कपाशी, मका, ज्वारी दाण्यांना हिरवे कोंब फुटुन नुकसान झालेले आहे.
शेतकऱ्याला राञंदिवस राबुन चांगल्या उत्पन्नाच्या आशेवर जणु पाणीच फिरले आहे. शेतकरी मोठया संकटात सापडलेला आहे. तरी शासनाने तात्काळ भडगाव तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसानीचे पंचनामे करावेत. तसेच भडगाव तालुका ओला दुष्काळी जाहीर करावा. अशी मागणी आहे. तसेच भडगाव तालुका मागील काळात दुष्काळी जाहीर झाला माञ याचा लाभच शेतकर्यांना मिळाला नाही. या आम्हा सर्वांना खेद आहे.
अखिलेश पाटील, तालुका अध्यक्ष,शेतकरी संघटना

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.