आद्यकवी महर्षी वाल्मिकि ऋषी यांची जयंती संपन्न .
थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात महर्षी वाल्मिकि ऋषी यांची जयंती निमित्त संस्था व विद्यालया तर्फे मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांचे शुभ हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाल पर्यवेक्षक डी के पाटील , कला शिक्षक एस बी सपकाळे , स्वप्निल सपकाळे , जे.ए चौधरी , वाय जे कुरकुरे यांची पुजा प्रसंगी उपस्थिती लाभली . रामायण रचियेते , आदर्श महाकाव्याचे मार्गदर्शक महर्षी वाल्मिकि ऋषी यांचे वाडःमयीन कार्याची महती विद्यार्थ्यांना दिली
विद्यार्थ्यांनी महर्षी वाल्मिकि यांचे नावाने घोषणा देत जय घोष केला . सर्व शिक्षक बंधुभगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .