थोरगव्हाण येथिल देशमुख विद्यालयात जिल्हास्तरीय खेळाडू साठी क्रीडंगणावर रोटोव्हेटर करून दिले. ऊमाकांत बाऊस्कर.
भुसावळ प्रतिनिधी – युवराज कुरकुरे तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धेत रावेर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत धावणे, हॅमर थ्रो , भालाफेक, लाँगजंम्प या सारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात 19 खेळाडू विद्यार्थ्यांनी चमकदार कार्य केले व जिल्हा पातळीवर खेळण्याचा मान मिळवला. जिल्हा पातळीवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुकर व सोयीचा सराव क्रीडा मैदानावर करता यावा यासाठी दि . 09 ऑक्टोबर 2024 बुधवार रोजी दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांनी डी . एस . देशमुख हायस्कुल थोरगव्हाण या शाळेचे कै . लक्ष्मण मकुंदा पाटील क्रीडांगण स्वतःच्या ट्रॅक्टरने रोटोव्हेटर करून दिले . बऱ्याच दिवसांपासून परतीचा लांबलेला पाऊस सुरू होता . जॉईंट सुटी असतांना तणनाशक फवारणी केल्यावर सुद्धा गवतावर काही फरक पडला नव्हता शेवटी ऊमाकांत वसंत बाऊस्कर यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्तुत्य असे कार्य केले . संपूर्ण क्रीडांगण गवत इतर छोट्या गवत वर्गातील वनस्पती समुळ नष्ट करून स्वखर्चाने स्वच्छ करून दिले . त्याबद्दल दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण अध्यक्ष चंदकांत चौधरी सचिव पवन चौधरी सर्व सन्मानीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय संचालक बंधू भगिनी , विद्यालयाचे मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे तर्फे ऊमाकांत बाऊस्कर यांचे आभार व्यक्त केले आहे . या उपक्रमाचे पालक वर्गातुन कौतुक होत आहे .