कोपरगाव तालुक्यातील वाळूतस्कारांसमोर महसूल व पोलीस प्रशासन अक्षरशा हतबल?कारवाई होत नसल्याने तालुका -जिल्ह्यात उलट सुलट चर्चेला उधान!
कोपरगाव तालुक्यात प्रामुख्याने माहेगाव देशमुख धारणगाव हा वाळू माफीयांचा अड्डा बनला आहे, माहेगाव देशमुख वनविभागातून गोदावरी नदी पात्राचे पाणी खालावल्यानंतर अक्षरशः दहा-बारा फरंड्याच्या साह्याने ही वाळू वाहतूक उघड- उघड केली जात आहे, या संदर्भात तहसीलदार प्रांत अप्पर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तसेच पोलीस प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात विशेष तक्रारी गेल्या आहे परंतु माहेगाव देशमुख धारणगाव येथे अवैद्य वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी महसूल तसेच पोलीस प्रशासन इतके कसे हातबल झाले यामुळे तालुक्यात चर्चेला वेगळे उदान आले आहे,

दिनांक 12 सप्टेंबर रोजी महसूल अधिकारी यांनी अवैध्य वाळू वाहतूक बंद होण्यासाठी माहेगाव देशमुख गोदावरी नदी पात्राचा वाळू वाहतुकीचा रस्ता येथे नाल्या मारल्या परंतु त्याच नाल्या अगदी कायद्याचं भय नसल्यासारखे वाळू तस्करांनी त्याच दिवशी बुजवल्याने महसूल आणि पोलीस प्रशासनाची थट्टा – गंमत केल्यासारखी घटना कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील वाळू माफयांनी केली आहे, तसेच एखाद्या सामान्य माणसाकडून अपराध घडला तर त्यास पोलीस, महसूल वन विभाग तातडीने कारवाई करतो परंतु अक्षरशः हे वाळू वाहतूक चोर माहेगाव देशमुख येथून उघड उघड ट्रॅक्टर फरांडे च्या साह्याने चोरून वाळू वाहतूक करत आहे या संदर्भात संबंधित पोलीस महसूल व वन विभाग तातडीची कारवाई का करत नाही हा संशोधनाचा भाग असून नागरिकांमध्ये दबक्या आवाजात पोलीस महसूल वन विभागावर बोट ठेवले जात आहे यामुळे वैद्य वाळू बंद होण्यासाठी माहेगाव देशमुख येथे प्रशासनाने केलेल्या वनविभागातील नाल्या या वाळूतस्करांनी बुजवल्या असून यावर पोलीस महसूल व वन विभाग शासकीय कामात अडथळा,व अवैध्य वाळू वाहतूक करणे बाबत गुन्हे दाखल करणार का असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे!










