भर पावसाळ्यात वाळू माफियांकडुन अवैध वाळू उपसा ; यासाठी यंत्रांचा वापर करत आहेत, हे खूपच धक्कादायक, गौण खनिज उत्खननाच्या विरोधी पथकाचे कार्य नाममात्र असल्याने देखील चिंता.

भर पावसाळ्यात वाळू माफियांकडुन अवैध वाळू उपसा ; यासाठी यंत्रांचा वापर करत आहेत, हे खूपच धक्कादायक . गौण खनिज उत्खननाच्या विरोधी पथकाचे कार्य नाममात्र असल्याने देखील चिंता.

एरंडोल : अवैध वाळू उपसाची समस्यांचे ग्रहण गिरणा नदीला लागलेले आहे त्यामुळे गिरणा नदी किनाऱ्यांचे झपाट्याने सपाटीकरण होत असल्याने चिंता व्यक्त केले जात आहे वाळू उपसा केल्यानंतर वाळू माफिया जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस अवैध वाळूपशामुळे पर्यावरण आणि नदी नाल्यांच्या प्रदूषणासाठी मोठा धोका आहे. यामुळे नदीच्या पारिस्थितिकीय साखळीला मोठा फटका बसतो. याशिवाय, वाळू उपसा करणाऱ्यांना कायद्याच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याची मुभा मिळते आणि शासनाला, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतं.

“अवैध गौण खनिज उत्खनन विरोधी पथक” फक्त नावापुरतं आहे. अधिक कडक कारवाई आणि निगराणी प्रणाली असायला हवी, यासाठी स्थानिक प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण संस्था अधिक कार्यक्षमतेने काम करायला पाहिजे. वैजनाथ टाकरखेडा कढोली दापोरी व नागदुल्ली या नदी किनारी पट्ट्यात अवैध गौण खनिज उत्खनन विरोधी विरोधी पथक नियुक्ती करण्यात आले आहे हे पथक दररोज व रात्री अवैध वाळु वाहतूक वर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे मात्र नियुक्त केलेले पथक हे जागेवरच हजर नसते त्यामुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळत असल्याने वाळु माफियांना कोणाचा आशीर्वाद असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई संदर्भात राजकीय दबाव ? महसूल विभागाचे पथक काही वेळेस नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकी संदर्भात कारवाई करत असताना माफियांकडून राजकीय लोकप्रतिनिधींना फोन लावून पकडलेली वाळूची वाहने सोडवणे संदर्भात फिल्डिंग लावली जात असल्याने महसूल विभागालाही कारवाई केली तर राजकीय लोकप्रतिनिधींच्या रोषाचा सामना करावा लागतो, तर महसूल विभागाच्या वतीने कारवाई केली नाही तर पर्यावरणीय धोका निर्माण होत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जाते त्यामुळे महसूल विभागाला इकडे आड इकडे विहीर अशी परिस्थिती असल्याचे बोलले जाते

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.