वनोली शिवारात अवैध शिकारी पकडले; पाच मोर मृतावस्थेत जप्त.

वनोली शिवारात अवैध शिकारी पकडले; पाच मोर मृतावस्थेत जप्त.

यावल (प्रतिनिधी) : वनविभागाच्या सतर्क कारवाईत यावल तालुक्यातील मौजे वनोली शिवार येथे दोन संशयित इसमांना जिवंत मोरांच्या शिकारी प्रकरणात रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत आरोपींकडून पाच मृत मोर, एक बंदूक (एअर रायफल), दोन चाकू, टॉर्च व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 31 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता वनपाल फैजपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी दबा धरून कारवाई करताना आरोपी 1) सलीम रुबाब तडवी व 2) सय्यद अफसर अली मुशताक अली (रा. मारूळ, ता. यावल) यांना जागेवरच पकडले. आरोपींनी फायरिंग केल्याचे कबूल केल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

सदर प्रकरणी वनरक्षक बोरखेडा बु. यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 2(16),2(20),2(36),9, 39 व 48अ अन्वये प्रकरण (प्र.रि.क्र. 05/2025) दाखल केले. आरोपींना 01 सप्टेंबर रोजी म. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, यावल यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही 03 दिवसांची वन कोठडी सुनावली.
ही कारवाई मा. वनसंरक्षक धुळे वनवृत्त निनू सोमराज, मा. उपवनसंरक्षक यावल जमीर शेख, मा. विभागीय वनाधिकारी (दक्षता) धुळे राजेंद्र सदगीर, मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील व मा. वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत फैजपूर राऊंड स्टाफ व रेंज स्टाफ सहभागी होते.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व करीत आहेत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.