जळगावात ‘सेवा पंधरवाडा 2025’ नियोजन बैठक संपन्न.

जळगाव – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे “सेवा पंधरवाडा 2025” या उपक्रमाच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत खासदार स्मिताताई वाघ, आमदार चंद्रकांतजी सोनवणे, आमदार मंगेशजी चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी सौ. जयश्री माळी तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक नखाते उपस्थित होते. बैठकीत पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे, नवकल्पनात्मक उपक्रम, प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थ्यांना थेट लाभ, घरांचे वितरण, स्थानिक समस्या सोडवणे यासह विविध शासकीय विभागांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली.

नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच शासनाच्या विविध अभियानांचा थेट लाभ मिळावा, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत राहील, असे सर्वांनी स्पष्ट केले.दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ महात्मा गांधी जयंती या कालावधीत महसूल विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत “सेवा पंधरवाडा” साजरा केला जाणार आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
याआधी राबविलेले उपक्रम यावेळी मोहिमेच्या स्वरूपात अधिक जोमाने राबविण्यात येणार असून, पंधरवाड्यानंतरही हे उपक्रम सातत्याने सुरू राहणार आहेत.








