शेतीत आधुनिकतेची झेप : ड्रोन फवारणीचा प्रयोग.

थोरगव्हाण येथून जवळच असलेले मांगी (ता. रावेर) येथील प्रगतशील शेतकरी श्री व्ही व्ही पाटील यांनी ३ एकर मका फवारणी केली साठी ड्रोन मागवले होते ,श्री. विलास वासुदेव राणे यांनी ३ एकर हायब्रीड शेतात इफ्फो फवारणी ड्रोनचा वापर करून दोघ शेतकारयांनी शेतीत आधुनिकतेची नवी दिशा दाखवली आहे. पारंपरिक फवारणीपेक्षा ही पद्धत वेळ, श्रम आणि खर्च वाचवणारी ठरत असून अचूक व समसमान फवारणी साधता येते.
या प्रयोगामुळे मजुरांच्या टंचाईवर उपाय, रसायनांचा अपव्यय कमी होणे, पर्यावरणावरील दुष्परिणाम आटोक्यात येणे आणि उत्पादनवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. व्ही व्ही पाटील ,विलास राणे यांचा हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गट शेती करून शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राचा वापर करावा वेळ पैसा वाचतो किटक नाशकांचा अपव्यय टाळता येतो . प्रगती शक्य आहे असे मत त्यांनी ठेवले .








