जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा व नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार व मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी महिला सेनेच्या शाखाध्यक्षपदी अनिता कापुरे, तर उपशाखाध्यक्षपदी लक्ष्मी भिल यांची निवड करण्यात आली. दरम्यान ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी आपल्या भाषणात महिला शाखेच्या कार्याचे कौतुक केले आणि हरीविठ्ठल नगर मधील कार्यालय हे परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेच्या कार्याला बळ देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.










