शक्तिपीठ मोर्चाला समर्थन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी पाचपट मोबदला मिळणार असल्यास शेती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे असं विरोधकांकडून सांगण्यात येतं आहे. दुसरीकडे, आज (19 जुलै) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या शेतकऱ्यांनी आपल्या हातामध्ये सातबारा उतारे घेतले होते. शेतीला पाचपट मोबदला पाहिजे, मोर्चातील शेतकऱ्यांची मागणी .










