अपहरण झालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलाची अतिशय क्रूरपणे हत्या; चार दिवसानंतर कालव्यात सापडला मृतदेह, माढ्याच्या अरण गावात खळबळ!

माढ्याच्या अरण गावातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात अपहरण झालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.माढ्याच्या अरण गावातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात अपहरण झालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून या शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली आहे. कार्तिक बळीराम खंडागळे असं हत्या झालेल्या मुलाच नाव आहे. कार्तिक हा 15 जुलै रोजी याच शाळेच्या मैदानावरून अचानक गायब झाला होता. प्राथमिक अंदाजानुसार कार्तिकचं अपहरण झालं असावा, असा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला होता. दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिसांनी आणि कुटुंबियानी शोध घेतला मात्र  कार्तिकचा कुठेही शोध लागला नाही.दरम्यान, चार दिवसानंतर अखेर कार्तिक खंडागळेचा आज  मृतदेह आढळून आला आहे. कालव्यात हा मृतदेह सापडून आला असून यात अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मात्र या हत्येचे नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. तर  शाळकरी मुलाच्या  कुटुंबियांमध्येही दहशत निर्माण झाली आहे.अकोल्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढायला सुरुवात केलीय. गेल्या 2 दिवसात अकोला पोलिसांनी दोन ठिकाणी टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा ‘रोड शो’ केलाय. आज अकोल्यातल्या जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या 3 आरोपींची धिंड काढण्यात आली.. तर परवा अकोल्यातल्या कृषी नगरात दोन गटात वाद गॅंगवॉर झाला होता.

याठिकाणी काल रात्री 7 आरोपींची धिंड काढण्यात आली होतीय. कृषी नगरात वर्चस्वाच्या लढाईतून हा गॅंगवॉर झाला होता. तलवारीसह बंदुकीचा या वादात वापर झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. आता या दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांची कृषी नगर परिसरात धिंड करण्यात आली होती.. तर आज जुने शहरात तीन गुंडांची धिंड काढण्यात आलीय. अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणारे या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हा ‘रोड शो’ होताय.. त्यामुळे या गुन्हेगारांना अकोला पोलिसांनी चांगला धडा शिकवला..

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.