अकोल्यात सराईत गुन्हेगारांच्या दोन गटात गॅंगवॉर, वर्चस्वाच्या लढाईत गोळीबार, ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड .

अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढलीये. अर्थातच खाकीने गुन्हेगाराची मस्ती उतरवलीये. काल(18 जुलै) अकोल्यातल्या कृषी नगरात दोन गटात वाद होत गॅंगवॉर झाला होता. अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढलीये. अर्थातच खाकीने गुन्हेगाराची मस्ती उतरवलीये. काल(18 जुलै) अकोल्यातल्या कृषी नगरात दोन गटात वाद होत गॅंगवॉर झाला होता. वर्चस्वाच्या लढाईतून हा गॅंगवॉर झाला होता. यात तलवारीसह बंदुकीचा या वादात वापर झाला होता. या वादादरम्यान दोन गट आमने-सामने भिडले. या संपूर्ण गॅंगवॉरमध्ये जवळपास 8 जण जखमी झाले होते. घटना स्थळावर गोळीबार देखील झाला होता. घटनास्थळावरून 2 जिवंत काडतूस आणि एक हवेत गोळी फायर केली होती. दरम्यान, काही जखमी आरोपींवर अकोल्याच्या  शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. पुढे आलेल्या माहितीनुसार, आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता. अशातच यातील दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांची आता कृषी नगर परिसरात धिंड काढण्यात आली.

 सद्यस्थित या प्रकरणात सात आरोपींसह देशी बनावट पिस्टल आणि तलवारी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी आरोपींनी कान पकडून माफी मागितली. तसेच यापुढे आपण गुन्हेगारी मार्गावर जाणार नसल्याचे आरोपींनी कान पकडून पोलिसांना सांगितले.दरम्यान, अकोल्यात झालेल्या दोन गटातील गॅंगवॉरचा हा वाद इतका भयंकर होता की परिसरातील नागरिक आणि कृषी नगर परिसरात भीतीच वातावरण पसरल होत. तर अटक करण्यात आलेल्या सतीश वानखडेसह आकाश गवई आणि काही प्रमुख गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली असून त्यांना चांगलाच धडा पोलिसांनी शिकवला आहे.जन्मठेपेतील फरार आरोपी पत्नीला भेटण्यासाठी घरी आला असता बीड पोलिसांनी बड्या शिताफीनं त्याला अटक केली आहे. बहिणीच्या खून प्रकरणात जन्मठेप झालेला आरोपी पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. मात्र, पत्नीला भेटण्यासाठी बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आलं आहे.

विठ्ठल उर्फ सोनू कळवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बहिणीच्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र जन्मठेप झाल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून तो पसार झाला. आरोपीच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते दोघांना लग्न करायचे होते. मात्र, विठ्ठलचा याला विरोध होता. यातून त्याच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने 2014 मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यादरम्यान खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना विठ्ठलने रुग्णालयात जाऊन बहीण आणि तिच्या प्रियकरावर प्राण घातक हल्ला केला. यात बहिणीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी होता.या प्रकरणात सत्र न्यायालयाने विठ्ठल कळवणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.