आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांकडूनच वसूल करणार बंदोबस्ताचा खर्च; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा मोठा निर्णय.

आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांकडून आता बंदोबस्तासाठी नेमलेल्या मनुष्यबळाचा खर्च वसूल करण्याची भूमिका बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतलीय. विविध मागण्या मान्य करण्यासाठी आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न काही जणांकडून केला जातो. मात्र आता बंदोबस्तासाठी नेमलेल्या मनुष्यबळाचा खर्च वसूल करण्याची भूमिका बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतलीय. गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या एकाला साडेतीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.मागण्यांसाठी आंदोलक टोकाचे पाऊल उचलून आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करतात. अशा वेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तासोबतच रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांनाही तैनात करावे लागते. अशा प्रकारचे अनाठायी आंदोलन केल्याने शासनाच्या मनुष्यबळ आणि यंत्रणेचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे बीडच्या पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पती महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे 18 महिन्यांपासून पोलीस प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र न्याय मिळत नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष प्रशन करून आत्महत्येचा प्रयत्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर 72 तासांच्या उपचारानंतर त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला.72 तास अतिदक्षता विभागात उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पोलीस प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला. या प्रकरणात आठ तपास अधिकारी बदलून देखील एकाही आरोपीला अटक नाही.

त्यामुळे आक्रमक पवित्रा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर न्याय मिळेल, अशी अपेक्षा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली.आमदार रोहित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर व्यक्त केलेल्या रोष विरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक झालीय. रोहित पवार यांच्यावर 353 नुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली. राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन घेऊन येता का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शरद पवार कधीच कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला वाकड्या शब्दात बोलले नाही. मात्र रोहित पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.. वारंवार पोलिसांना टारगेट केल्या जाणाऱ्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर पोलीस बॉईज संघटनेकडून निदर्शने केली जाणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.