डी. एस. देशमुख विद्यालयात HbA1c आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न.

डी. एस. देशमुख विद्यालयात HbA1c आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न.थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र थोरगव्हाण यांच्या वतीने विद्यार्थ्यांची HbA1c (ग्लायकेटेड हिमोग्लोबिन) तपासणी करण्यात आली. ही चाचणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती रक्तातील गेल्या २-३ महिन्यांतील सरासरी साखरेची पातळी दर्शवते.

या तपासणीद्वारे मधुमेह किंवा मधुमेहापूर्व स्थिती ओळखणे शक्य होते. त्यामुळे योग्य वेळी उपचार, आहार, आणि जीवनशैलीतील सुधारणा करता येतात. आरोग्य सवयींकडे विद्यार्थ्यांचा कल वळवण्याच्या दृष्टीनेही ही चाचणी उपयुक्त ठरते.कार्यक्रमास डॉ. तुषार चौधरी (वैद्यकीय अधिकारी),  किशोर महाजन (आरोग्य निरीक्षक), कैलास आदिवाले (आरोग्य सेवक), श्रीमती छाया सोनवणे (महालॅब टेक्निशियन) तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

शाळेचे मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी आरोग्य पथकाचे स्वागत करून विद्यार्थ्यांना तपासणीचे महत्त्व पटवून दिले.या उपक्रमात टी. पी. घुले, वाय. जे. कुरकुरे तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सजगतेसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य आणि प्रेरणादायी ठरला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.