अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरात चोरी, मोलकरणीनेच केली हातसफाई, आमदार पावसाळी अधिवेशनात असतानाच पैशांवर मारला डल्ला.

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर चक्क आमदारांच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या  सरोज अहिरे  यांच्या नाशिकमधील जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. या प्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरीण संगीता श्याम केदारे (रा. जेल रोड) हिने कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी डॉ. प्रवीण रामदास वाघ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि. 6 जुलै) दुपारी संगीता केदारे हिने कपाटातून एक लाख रुपये चोरून नेले. या काळात आमदार सरोज अहिरे या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत होत्या.

या काळातच मोलकरणीने पैशांवर डल्ला मारलाय. यासोबतच ऑक्टोबर 2024 ते 15 जुलै 2025 या कालावधीत घरातून वेळोवेळी रोख रक्कम चोरून नेल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रवीण वाघ यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलिसांनी संगीता केदारे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मोठ्या भावाकडे सहकुटुंब जेवणासाठी गेलेल्या लहान भावाच्या घरी गुरुवारी रात्री धाडसी घरफोडी झाली असून, सुमारे 22 तोळे सोन्याचे, दीड किलो चांदीचे व रोख रक्कम दहा हजार रुपये असा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

लहान भावाची पत्नी वैशाली किशोर मैद (45, रा. गौरी मंगल सोसायटीजवळ, मंगलमूर्तीनगर, कॅनॉल रोड, जेलरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाइकांकडे जेवणासाठी गेले होते. जेवण करून रात्री सव्वाअकराच्या दरम्यान घरी परतले तेव्हा घराचा कडी कोयंडा तोडलेला आढळून आला तसेच घरातील कपाटातील वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या दिसून आल्या व कपाटातील मुख्य लॉकरमधून सुमारे साडेएकवीस तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने, त्यात गणपती उत्सवाकरिता केलेली आभूषणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.