महिला शेतमजुरांवर कोसळली वीज, अस्मानी आघातामुळे दोघींचा चटका लावणारा अंत; परिसर हळहळला.

रामटेक तालुक्यातील चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. रामटेक तालुक्यातील चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. शेतात रोजंदारीवर धान रोवणीचे काम सुरू असताना अचानक आकाशातील संकटामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.रामटेक तहसील येथील शितलवाडी-चारगाव रस्त्यालगत असलेल्या शेतकरी रमेश जगन्नाथ रहाटे यांच्या शेतात ही घटना घडली. मृत महिलांची नावे मंगलाबाई झिबल मोटघरे (४०, रा. शितलवाडी, परसोडा) आणि वर्षा देवचंद हिंगे (३३, रा. भोजापूर) अशी आहेत.

दोघीही अनुभवी आणि नियमित मजुरी करणाऱ्या महिला होत्या. शुक्रवारी दुपारी सुमारास सुमारे २५ महिला धान रोवणीसाठी शेतात काम करत होत्या. त्यातील सात महिला जेवणासाठी थोडे बाजूला झाडाखाली बसल्या होत्या. त्याचवेळी वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही क्षणांतच प्रचंड गडगडाट करत वीज थेट या महिलांच्या दिशेने आली आणि त्या जागीच कोसळल्या.घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शेतकरी रमेश रहाटे आणि त्यांच्या मित्रांनी सुनील देवगडे यांच्या मदतीने जखमींना तातडीने रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रमेश कोळपे आणि रामटेक पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र मानकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत संपूर्ण माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली.अतिवृष्टी आणि हवामानातील बदलामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांची जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक ती सुरक्षितता आणि यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही परिसरातून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शितलवाडी, भोजापूर आणि चारगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.