घरात घुसून मर्डर करेन; पुण्यात पोलिसांना धमकी देत तोंडावर फवारला मिरची स्प्रे ; पोलिस ठाण्यात राडा.

पुण्यात सहकारनगर पोलिस ठाण्यात एका सराईत गुन्हेगाराने राडा घातला, त्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर मिरची स्प्रे फवारला आणि तोडफोड केली. दोन वेळा मकोका लागलेल्या बारक्या लोंढे नावाच्या गुन्हेगाराने हे कृत्य केलं आहे.सहकारनगर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर सराईत गुन्हेगाराने मिरची स्प्रे फवारला. या हल्ल्यामुळे चार ते पाच पोलिस कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास झाला. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात तोडफोड करत काचा फोडल्या. रक्तबंबाळ अवस्थेत तो ओरडत राहिला आणि स्वतःला इजा करून घेतली.

दोन वेळा मकोका कारवाई झालेला आणि सध्या जामिनावर बाहेर असलेला ‘बारक्या लोंढे’ या कुख्यात गुन्हेगाराने सहकारनगर पोलिस ठाण्यातच थैमान घातल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रात्रभर चाललेल्या या गोंधळात पोलिसांना आरोपीला काबूत ठेवताना अक्षरशः नाकीनऊ आले. यावेळी आरोपीने पोलिसांनाच धमकी देत, “तुमच्या घरात घुसून मर्डर करीन,” अशी खुलेआम धमकी दिली. घटनेदरम्यान आणि नंतरही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी अनुपस्थित राहिल्याने पोलीस दलामध्येही नाराजी पसरली आहे. पोलिस उपायुक्त, वरिष्ठ निरीक्षक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यापैकी कोणीही घटनास्थळी न पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

बारक्या लोंढे’ या सराईत गुन्हेगारावर दोन वेळा मकोका अंतर्गत कारवाई झाली असून, सध्या तो जामिनावर बाहेर आहे. अशा धोकादायक गुन्हेगाराने पोलिस ठाण्यातच थेट हल्ला केला, तरीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिले नाहीत. या प्रकारामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याची भीती व्यक्त केली जात असून, पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर समाजात संतापाची भावना आहे.दरम्यान, या घटनेनंतर पुण्यात एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. “जेव्हा पोलीसच असुरक्षित असतील, तेव्हा सामान्य नागरिकांनी आपली सुरक्षा कुणाकडे मागावी?” असा सवाल उपस्थित होत आहे. तसंच सहकारनगरसारख्या शहरातील शांत आणि नागरी भागात पोलिस ठाण्यात अशा पद्धतीची घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.