विधिमंडळ राडा प्रकरणात मोठी अपडेट; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, तर रोहित पवारांनी…

विधानभवनात गुरुवारी मोठा राडा झाला. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. राज्य विधिमंडळाच्या पावसाची अधिवेशनादरम्यान गुरुवारी विधानभवनात मोठा राडा झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीनंतर पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता.

जोपर्यंत देशमुख यांना सोडणार नाही, तोपर्यंत गाडीसमोरून हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली असताना विधिमंडळातही याप्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांवर कारवाईसंबंधीचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी अहवाल मागवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

गेले काही दिवस आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्यात विधानमंडळ परिसरात खटके उडत होते. दोन दिवसांपूर्वी आमदार पडळकर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी आमदार आव्हाड यांनी त्यांच्यावर शेरेबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. गुरुवारी दोन्ही नेते आणि त्यांचे समर्थक एकमेकांच्या समोर आले. जोरदार घोषणाबाजी झाली आणि बघता बघता मारामारी सुरू झाली. या घटनेनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. “आम्ही अहवाल मागवला आहे आणि योग्य ती कारवाई करू,” असे ते म्हणाले.विधानभवन राड्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांसोबत वाद सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या वादात उडी घेतली. या प्रकरणाबद्दल पोलिसांसोबत चर्चा करत असताना रोहित पवारांचा पारा चढला. हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा, असं म्हणत रोहित पवार यांनी पोलिसांना सुनावल्याचं पाहायला मिळालं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.