पाण्यात उडी घेतली अन् आयुष्याची दोर तुटली, ठाण्याच्या रायलादेवी तलावात 22 वर्षीय तरुणासोबत आक्रित घडलं.

पावसाळ्यात नदी-नाले, तलाव यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. समुद्रालाही उधाण आलेलं असतं. अशावेळी अनोळखी ठिकाणी जाणं, आणि पाण्यात उतरणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. बुधवारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावात एक दुर्दैवी घटना घडली. रघुनाथ नगरमध्ये राहणारा २२ वर्षीय गुरुराज पेडामकर नावाचा तरुण तलावात बुडाला. तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तलावाला संरक्षक भिंत नसल्याने आणि सुरक्षारक्षक नसल्याने या घटना वारंवार घडतात, असे स्थानिक माजी नगरसेवकांनी सांगितले.

गुरुराज पेडामकर मित्रांसोबत रायलादेवी तलावाजवळ गेला होता. तो पोहण्यासाठी तलावात उतरला. पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका मिनल संख्ये, वागळे पोलिस स्टेशनचे अधिकारी, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रयत्नांनी बचाव पथकाने गुरुराजचा मृतदेह बाहेर काढला.ठाण्याच्या रायलादेवी परिसरात वारंवार अशा घटना घडतात, त्यामुळे नागरिक नाराज आहेत. प्रशासनाकडे सूचना केल्या आहेत. मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसून भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशीही चर्चा केल्याचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे याबाबत निवेदनही दिले आहे.

रेपाळे यांनी सांगितले की, तलाव परिसरात विद्युत व्यवस्था नाही आणि पात्रात गाळ साचला आहे. त्यांनी संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्याची आणि संरक्षक जाळ्या बसवण्याची मागणी केली आहे. “तसेच ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह घटनास्थळाची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या,” असेही ते म्हणाले. माजी नगरसेविका मिनल संख्ये यांनीही तलावाच्या दुरावस्थेची पाहणी केली.पावसाळ्यात नदी-नाले, तलाव यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. समुद्रालाही उधाण आलेलं असतं. अशावेळी अनोळखी ठिकाणी जाणं, आणि पाण्यात उतरणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.