वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात.

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात.मौजे बोरअजंटी (ता. चोपडा) येथे राखीव वनकक्ष क्र. २३६ च्या हद्दीत वनविभाग व पोलीस दलाच्या संयुक्त गस्तीदरम्यान २ जणांकडून काळवीटाचे शिंगे व शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनांक १७ जुलै रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर, वनपाल बोरअजंटी, परिमंडळ व रेंज स्टाफ तसेच पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांच्या संयुक्त नाकाबंदी दरम्यान, स्प्लेंडर प्लस (MP-10/NC-4857) मोटरसायकलवरील दोन व्यक्तींना अडवून तपासणी केली असता पिवळ्या गोणीत काळवीटाचे २ शिंगे व सुमारे २ कि. ग्रॅ शिजवलेले मांस आढळून आले. सदर दोन्ही इसम ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –वांग्या पुसल्या बारेला (वय ४८, रा. टाक्यापाणी, ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. बोरखेडा, ता. धरणगाव) धुरसिंग वलका बारेला (वय ४५, रा. वरुड, जि. खरगोन, ह.मु. पळासखेडा)तपासा दरम्यान त्यांनी काळवीटाची शिकार केल्याची कबुली दिली. याप्रकरणी प्र.रि.क्र. ०३/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवून काळवीटाचे शिंगे, मांस, मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे यांनी सांगितले की, “वन्यजीव शिकार करणे, त्यांचा अधिवास धोक्यात आणणे हे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५१ चे उल्लंघन असून, सदर गुन्हा अजामीनपात्र व दखलपात्र स्वरूपाचा आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ७ वर्षांपर्यंत कारावास आणि २५,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.”सदर कारवाई मा. वनसंरक्षक (प्रा.) धुळे, उपवनसंरक्षक यावल, विभागीय वनअधिकारी (दक्षता) धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (चोपडा), वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर, पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण व त्यांच्या पथकांनी केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.