मुंबईत मोठी दुर्घटना, 3 मजली इमारत कोसळली; 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील भारत नगर परिसरात आज सकाळी तीन मजली चाळ कोसळून एक मोठी दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली किमान दहा जण अडकल्याची भीती आहे, सात जणांना वाचवण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे वांद्रे पूर्व येथील भारत नगर परिसरात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील भारत नगर परिसरात शुक्रवारी सकाळी एक तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली चाळ कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली किमान १० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

या दुर्घटनेत सात जणांना वाचवण्यात आलं असून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.भरत नगरमधील चाळ क्रमांक ३७ ही तीन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळच्या शांततेत अचानक मोठा आवाज झाला आणि लोकांचा एकच आक्रोश सुरू झाला. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. आठ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.चाळ कशी कोसळली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

बचावकार्य संपल्यानंतर या घटनेची चौकशी केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. घडलेल्या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेक लोक घटनास्थळी जमा झाले असून प्रशासनाला मदत करत आहेत.सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे, परंतु प्रशासन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. तसंच, अधिक माहितीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असंही सांगण्यात आलं आहे. घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.