विधिमंडळाच्या गेटवर मध्यरात्री तुफान राडा, कार्यकर्त्यासाठी आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली घुसले, खेचून बाहेर काढण्याची वेळ.

विधानभवनाच्या मागच्या गेटवरुन जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना पोलिस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केलेविधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळे वळण घेतले आहे. गुरुवारी रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात जोरदार पडसाद उमटले. मारहाण करणाऱ्यांना सोडून पोलिसांनी मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला अटक केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी समर्थकांसह ठिय्या मांडला. विधान भवनाच्या गेटवर मध्यरात्री एक वाजता जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाल होतं.
विधानभवनाच्या मागच्या गेटवरुन जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना पोलिस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत धरपकड सुरु केली.

यावेळी आव्हाड थेट पोलिसांच्या गाडीखाली चालले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरशः फरफटत बाहेर ओढले.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील घटनास्थळी हजर होते. विधिमंडळाचे अधिवेशन आज, 18 जुलै रोजी संपणार आहे. आदल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी झालेल्या वाद आणि त्यानंतर आलेल्या धमक्यांविषयी माहिती दिली. यानंतर विधानभवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वाद झाला.गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात बाचाबाची झाली.

“यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जात आहे. तर मारहाण करणाऱ्या पाच जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत आहेत” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.विविध मुद्द्यांवर चर्चा घडणाऱ्या विधिमंडळाच्या परिसराला गुरुवारी अक्षरश: आखाड्याचे स्वरूप आले. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला गेला. दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या समोर उभे ठाकले आणि अगदी हाणामारीपर्यंत हे प्रकरण गेले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अहवाल मागवून कारवाई करण्याची घोषणा केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.