काटेरी फळ तरी खिशाला बळ, ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून मजबूत नफा, पाच एकरात 45 लाखांचं उत्पन्न.

 नंदुरबारमधील शेतकरी प्रकाश पटेल यांनी ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती करून दाखवली आहे. पहिल्या वर्षी खर्च जास्त आला असला, तरी पुढील १५ वर्षे त्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर बाजारपेठ चांगली असल्याने त्यांना चांगला भाव मिळत आहे. अल्पमजूर लागत असल्याने हे पीक शेतकऱ्यासाठी वरदान ठरले आहे.नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील शेतकरी प्रकाश पटेल यांनी ड्रॅगन फ्रुटची शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पहिल्या वर्षी खर्च अधिक आला असला तरी पुढील पंधरा वर्षे त्यांना उत्पन्न मिळणार आहे. महाराष्ट्र आ्णि गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने त्यांना चांगली बाजारपेठ मिळून ड्रॅगन फ्रुटला चांगला भाव मिळत आहे. कमी पाणी तसेच अल्पमजूर लागत असल्याने हे पीक शेतकऱ्यासाठी वरदान ठरले आहे. यंदा त्यांना 45 लाखाचे उत्पन्न मिळणार आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील 45 वर्षीय शेतकरी प्रकाश शिवदास पटेल यांनी अडीच वर्षाआधी त्यांच्या पाच एकर शेतात कलमांपासून ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली.

सुरुवातीला त्यांना एकरी तीन लाख रुपये खर्च आला. पहिल्या वर्षी त्यांना पाच एकर मध्ये पाच टन ड्रॅगन फ्रुट झाले. दुसऱ्या वर्षी दहा टन उत्पन्न निघाले.तर यंदा आतापर्यंत दहा टन फळे निघाले असून. यंदाच्या हंगामात 30 ते 35 टन ड्रॅगन फ्रुट निघण्याचा अंदाज आहे. मॉलमध्ये दिसणारे हे फळ आता रस्त्यावर दिसू लागले आहे.महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नंदुरबार तसेच गुजरात राज्यातील सुरत, बडोदा आणि अहमदाबाद येथील बाजारपेठ त्यांना उपलब्ध असल्याने 140 ते 150 रुपये किलोने ते व्यापाऱ्यांना विक्री करतात. पहिल्या वर्षी या पिकाला अधिकचा खर्च येत असला तरी पुढील पंधरा वर्षे अल्प खर्च आहे. त्यामुळे त्यांना पाच एकर मध्ये यंदा 45 लाखापेक्षा अधिक उत्पन्न होणार आहे. त्यांनी युट्युब वरून ड्रॅगन फ्रुट ची शेती कशी करावी हे शिकून शेती करत पश्चिम बंगाल मधून रोप आणली होती. पाच एकरात त्यांनी दहा हजार रोपांची लागवड केली. दरवर्षी ड्रॅगन फ्रुट चे उत्पन्न हे वाढत जाते. कमी पाण्यात हे फळ येत असून मजूर कमी लागत असल्याने शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुटची शेती वरदान ठरली आहे.

प्रकाश शिवदास पटेल या 45 वर्षीय शेतकऱ्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी युट्युब वरून ड्रॅगन फ्रुटची शेती केली. त्यांचे एकत्र कुटुंब असून त्यांना शेतीत त्यांची मोठी मदत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी पश्चिम बंगाल येथून बिज आणले होते. त्यानंतर ड्रॅगन फ्रुट ची शेती केली. त्या शेतीतूनच कलम त्यांनी तयार करून नवीन पाच एकर मध्ये लागवड केली. त्यामुळे त्यांचे सुमारे सहा लाख रुपये वाचले. या शेतकऱ्याचा कष्टाला आता गोड फळे आले आहेत. पहिल्या वर्षी या पिकाला खर्च अधिक असला तरी पुढील पंधरा वर्षापर्यंत अल्प खर्चामध्ये उत्पन्न दरवर्षी वाढते. उन्हाळ्यात ते या पिकासाठी नेट लावून त्याची निगा राखतात. या शेतकऱ्यामुळे अनेकांना त्याची प्रेरणा मिळत असून त्यांची ड्रॅगन फ्रुटची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्या ठिकाणी भेट देत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.