नामांकित हॉस्पिटलच्या ICU मध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या अंगावरील दागिने लंपास, कमर्चाऱ्यांनी…

छत्रपती संभाजीनगरमधील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका महिलेच्या हातातील तब्बल चार लाख रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या चोरीला गेल्या. महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये अशा प्रकारे चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेच्या हातातील तब्बल 4 लाखांच्या पाटल्या या काढून घेण्यात आल्या. हैराण करणारे म्हणजे एका बड्या खासगी रूग्णालयातील आयसीयूमध्ये हा प्रकार घडलाय. ज्यावेळी ही महिला शुद्धीवर आली, त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. सोन्याच्या पाटल्यांबद्दल रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कुटुंबियांनी लगेचच पोलिसात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेच्या हातातील 4 लाखांच्या पाटल्या लंपास झाल्याची घटना शहरातील नामांकित खाजगी रूग्णालयात उघडकीस आली.

याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शिरीष सुभाष सुधाकर लघाने रा.रांजणगाव खुरी ता. पैठण यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनंतर पोलिसांनी लगेचच रूग्णालयात धाव घेतली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरीचा प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 29 जून ते 4 जुलै दरम्यान फिर्यादी शिरीष लग्ने यांची आई शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात आयसीयू वार्डमध्ये उपचार घेत होत्या. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपैकी अज्ञात इसमाने संधी साधली. अन् उपचार घेत असलेल्या महिलेच्या हातातील तब्बल 4 लाख रुपयांच्या बांगड्या लंपास केल्या.

काही वेळाने हातात पाटल्या दिसून आल्या नाहीत, यामुळे एकच गोंधळ उडाला.याबाबत नातेवाईकांनी रुग्णालयात विचारपूस केली असता डॉक्टर तसेच स्टॉफने देखील प्रतिसाद दिला नाही. काहींनी तर उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान या गंभीर घटनेप्रकरणी फिर्यादींनी या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मुळात म्हणजे आयसीयू विभागात रूग्णाला दाखल करून घेण्याच्या अगोदरच माैल्यवान वस्तू नातेवाईकांकडून देण्यास सांगितले जाते. मात्र, या रूग्णालयात सोन्याच्या पाटल्या रूग्णाला कशा आत आणू दिल्या यावरून विविध चर्चा या रंगत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.