17 दिवसांनी रात्री 11.21 वाजता बघा, सोनं मिळेल; कोथरुडच्या महिलेला हंडा देऊन गंडा, अडीच लाख उकळले.

तक्रारदार महिला कोथरूड भागात राहत असून, घरकाम करून उदरनिर्वाह करतात. त्या एका तृतीयपंथीयाच्या ओळखीने महंमद याच्या संपर्कात आल्या. ‘सोन्याचा हंडा मिळवून देतो’ अशी बतावणी करून, कोरेगाव पार्कमधील एका भोंदूबाबाने एका मोलकरीण महिलेकडून अडीच लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.महंमद खानसाहेब जान मदारी, वय 65 वर्ष, रा. मदारी वस्ती, कोरेगाव पार्क, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार; तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, 2013 मधील कलम 3 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार महिला कोथरूड भागात राहत असून, घरकाम करून उदरनिर्वाह करतात.

त्या एका तृतीयपंथीयाच्या ओळखीने महंमद याच्या संपर्कात आल्या. आरोपीने महिलेला ‘घरगुती अडचणींवर उपाय करून देतो, दोष काढतो,’ असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला विश्वासात घेऊन, ’17 दिवसांत सोन्याचा हंडा मिळेल, अशी बतावणी केली. यासाठी महिलेने दोन लाख 60 हजार रुपये आरोपीला दिले.आरोपीने महिलेला पूजेसाठी घरी बोलवून एक मातीचे मडके काळ्या कपड्याने झाकून दिले. ‘हे मडके 17 दिवसांनी रात्री 11 वाजून 21 मिनिटांनी उघडावे, त्यात सोने मिळेल,’ असे सांगितले. महिलेने ठरलेल्या दिवशी मडके उघडले असता त्यात सोन्याऐवजी माती आढळली. त्यामुळे महिलेला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. तिने पुन्हा महंमद याच्याशी संपर्क साधला असता, त्याने तिला परत घरी बोलावले.

मात्र, या वेळी महिलेने पोलिसांची मदत घेतली.आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे तपास पथक करीत आहे. पोलिसांनी नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.महिलेच्या तक्रारीनंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे व निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिल्पा निमकर, पोलिस हवालदार प्रवीण पडवळ, मयूर शिंदे व विवेक जाधव यांनी महिलेला सोबत घेऊन सापळा रचला, महंमद याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.