पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली, मोठी अपडेट, लवकरच…

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटल्याचे सांगितले असून, लवकरच त्यांना कंठस्नान घातले जाईल, असे म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून, दहशतवाद्यांचे मनसुबे हाणून पाडले जातील.जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल मोठे विधान केले. मनोज सिन्हा म्हणाले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांना संपवले जाईल. गांधी स्मृती येथे ‘जम्मू-काश्मीर: शांती की ओर’ या विषयावर व्याख्यान वेळी ते बोलत होते. काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे ठामपणे सांगितले. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. यावेळी फक्त पर्यटकांना टार्गेट करण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांची हत्या गोळ्या झाडून करण्यात आली.

भारताकडून पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 6 आणि 7 मे च्या दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. मनोज सिन्हा म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला जोरदार उत्तर देण्यात आले. हल्लेखोरांची ओळख पटली आहे आणि मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की आता त्यांचे जिवंत राहणे कठीण आहे. चांगली बातमी नक्कीच येईल, पण लगेचच तारीख सांगणे योग्य नाही.मनोज सिन्हा यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात विविध दहशतवादी संघटनांचे प्रमुख मारले गेले आहेत आणि त्यांचीही तीच गत होणार आहे.

मुळात म्हणजे दहशतवाद्यांनी चक्क धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार केला. दहशतावाद्यांचे मुख्य टार्गेट हे फक्त हिंदू पर्यटक होते. या दहशतवादी हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. दहशतवादी हल्ल्यानंतर काही वेळातच अमित शहा हे पहलगाममध्ये पोहोचले होते.भारताने हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 6 आणि 7 मे च्या दरम्यानच्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या अनेक दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ही सर्व ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतावर हल्ला केला, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, ऑपरेशन सिंदूर हे अजूनही संपलेले नाहीये.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.