उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं वक्तव्य केलं. याच वक्तव्याचा दाखला दे राज्याच्या विधानपरिषद सभागृहात विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांच्या निरोप समारंभाचे भाषण होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अंबादास दानवेंमधील कार्यकर्त्याचा गुण सांगितला. मात्र, या भाषणांवेळी शिंदे आणि ठाकरेंमधील जुगलबंदी पाहायला मिळाली. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाषण करताना नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला मारला. अंबादास हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नव्हता, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून त्याचं नेतृत्व घडल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं. त्यावर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) शिंदेंना टोला लगावला. त्यानंतर, एकनाथ शिंदेंसाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बॅटिंग केली.










