अंबादास दानवे ‘तुम्ही पुन्हा या’, पण याच पक्षातून या; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत, तसेच त्यांनी कधीही समोर भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोलवाटोलवी झाल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे यांच्या समोरच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली. तर दुसरीकडे अंबादास दानवे यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. अंबादास दानवे तुम्ही पुन्हा या, पण याच पक्षातून या असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर मी देवेंद्र फडणवीसांप्रमाणे पुन्हा येईन, पण कुठून येईन ते मात्र विचारू नका असं मिश्कील वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. 

अंबादास दानवे यांची टर्म संपली असं मी म्हणणार नाही. तुमची पहिली टर्म पूर्ण झाली आहे. त्यामुळे मी पुन्हा येईन असं जोरात म्हणा. पण ते याच पक्षातून असंही म्हणा असं उद्धव ठाकरे म्हणाले. अंबादास दानवे यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीच्या समाप्तीनंतर त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून ऑफर येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना टोला त्या आधी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते की, अंबादास हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही. तोच संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारला. ते म्हणाले की, अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. पण त्यांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाही. समोरच्या ताटात काही चांगलं दिसलं म्हणून तिथे गेला नाहीत. पदं येतात आणि पदं जातात, पण जनतेच्या मनात आपली काय प्रतिमा राहते हे महत्वाचं. असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात अंबादास माझ्या घरी आले होते. त्यावेळी टर्म संपतेय, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही असं मी त्यांना म्हणालो. पण आतापर्यंत जे दिलंय ते खूप दिलंय असं अंबादास म्हणाले.मुख्यमंत्री माझे आभार मानू शकणार नाहीत उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता भाजपने आम्हाला दिला याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मात्र ते माझे आभार मानू शकतील की नाही याबद्दल शंका आहे. कारण त्यांनी माझ्याकडून घेतलेले नेते हे वेगळेच आहेत.”

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.