नालासोपारा येथून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. ड्राइविंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून दोन वाहतूक पोलिसांना पकडत खाली पाडून अक्षरक्ष: लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे.नालासोपारा येथून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. ड्राइविंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून दोन वाहतूक पोलिसांना पकडत खाली पाडून अक्षरक्ष: लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे. मारहाण करणारे दोघं बापलेक असून नालासोपरातीलच राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या भर रस्त्यात सुरू असलेल्या या पोलीस आणि मारहाण करणार्यांचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.










