अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींच्या रस्त्यांच्या घोटाळ्याला राजकीय संरक्षण; खासदार संजय राऊत यांचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र.

 अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामात सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.अहिल्यानगर महापालिकेतील (Ahilyanagar Municipal Corporation) 776 रस्त्यांच्या कामात सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी खासदार राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. महापालिकेतील प्रशासक आणि अधिकारी संगनमताने महाराष्ट्रातील तिजोरीची लूट करत असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पत्रात लिहिलं आहे.

दरम्यान, सत्ताधारी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या वरदहस्ताने आणि संगनमताने अहिल्यानगर शहरातील 2016 ते 2020 दरम्यान सुमारे 776 रस्त्यांचा  350 ते 400 कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. हा भ्रष्टाचार अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी समोर आणल्याचाही राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रात म्हटले आहे.  तसेच याबाबत तक्रार महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. शिवाय त्यानंतर 2020 ते 2023 या वर्षात सुद्धा अशाच कार्य प्रणालीनुसार 200 ते 300 कोटींचा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महानगर पालिकांवर सध्या प्रशासकांचे राज्य असले तरी अहिल्यानगर सारख्या पालीकेत लोकप्रतिनिधी, अधिकारी ठेकेदार मिळून पालिक लुटून खात आहेत, त्यामुळे रस्ते, आरोग्य या सारख्या सुविधा देखील जनतेला मिळत नाहीत. परिणामी अहिल्यानगर बाबत पुढील पत्रावर कारवाई व्हावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.