रत्नागिरीत रेड अलर्ट होण्याची शक्यता असून ढगफुटीसारखा पाऊसही होऊ शकतो. त्यामुळे रायगड आणि कोकणातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून तुफान पाऊस कोसळतोय. नद्या, नाले,ओढे दुथडी भरून वाहत आहेत. महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर रत्नागिरीत ढगफूटीसदृश्य पाऊस होऊ शकतो. परिणामी रत्नागिरीला मंत्री उदय सामंत यांनी धोक्याचा इशारा दिलाय. रत्नागिरीत आज रेड अलर्टही दिला जाऊ शकतो असंही सांगण्यात येत आहे. (Rain Updates) 2021 ची आठवण करणारे दृश्य.










