नवीन पोरं म्हणताय खरं, पण गोऱ्यांची जिरवत 70 वर्षांनंतर रचला शानदार विक्रम, तुम्हालाही वाटेल अभिमान.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले, इंग्लंडच्या 20 विकेट्सपैकी 12 क्लीन बोल्ड घेतल्या. विजयासाठी भारताला 135 धावांची गरज असून इंग्लंडला 6 विकेट्स घेणे आवश्यक आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 70 वर्षांनंतर असा विक्रम केला आहे.भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये गोलंदाजांनी यजमानांना बॅकफूटला ढकलले. एकंदरित आताची परिस्थिती पाहता भारताला शेवटच्या दिवशी विजयासाठी 135 धावांची गरज आहे तर इंग्लंड संघाला सहा विकेट घ्याव्या लागणार आहेत.भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटीत जे यश मिळवले, ते कसोटी क्रिकेटमध्ये 70 वर्षांनंतर दिसले. लॉर्ड्स कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडचे 20 विकेट्स घेतले आणि त्यामध्ये 12 विकेट्स क्लीन बोल्ड होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय गोलंदाजांनी कधीही इतके बोल्ड केले नव्हते. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ६ क्लीन बोल्ड केले, तर वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या डावात चारही विकेट क्लीन बोल्ड घेतले. याव्यतिरिक्त, सिराज आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बोल्ड केले.

लॉर्ड्सवर ही कसोटी सुरू आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांनी पहिल्या डावात प्रत्येकी ३८७ धावा केल्या. यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी खेळपट्टीकडून गोलंदाजांना चांगली मदत मिळायला लागली. त्याचा फायदा घेऊन भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा केला. सहाव्या षटकात मोहम्मद सिराजने बेन डकेटला माघारी पाठविले. यानंतर सिराजने ओली पोपलाही पायचीत टिपून भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. यानंतर कर्णधार शुभमन गिलने नितीशकुमार रेड्डीच्या हाती चेंडू सोपविला. रेड्डीने कर्णधाराला निराश केले नाही. त्याने झंक क्रॉलीचा अडसर दूर केला. यानंतर आकाशदीपने हॅरी बुकचा त्रिफळा उडविला. उपाहारापर्यंत इंग्लंडची ४ वाद ९८ अशी स्थिती झाली होती. या वेळी जसप्रीत बुमराहला मात्र यश मिळाले नव्हते.लक्ष्याचा करताना भारताची पाठलाग सुरुवात निराशाजनक झाली.

पहिले षटक निर्धाव खेळून काढल्यानंतर यशस्वी जयस्वाल, जोफ्रा आर्चरच्या उसळत्या चेंडूवर खराब फटका मारून बाद झाला. यानंतर के. एल. राहुल आणि करुण नायरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रायडन कार्सने करुण नायरला पायचीत टिपून ही जोडी फुटली. यानंतर कर्णधार शुभमन गिललाही कार्सने पायचीत टिपले. त्याआधी ‘डीआरएस’मुळे गिल बचावला होता. मात्र, दुसऱ्यांदा ‘डीआरएस’ त्याला वाचवू शकला नाही. यानंतर खेळ संपायला अखेरचे षटक शिल्लक असताना ‘नाइट वॉचमन’ आकाशदीपचा त्रिफळा बेन स्टोक्सने उडविला, आता अखेरच्या दिवशी रंगतदार लढत बघायला मिळणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.