शेतकऱ्यांना फक्त 40 रुपयात मिळणार पीकविमा; अंतिम मुदत कधी? कुठे कराल अर्ज? जाणून घ्या.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.‘पंतप्रधान पीक विमा योजनेत सीएससी केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी ४० रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क देऊ नये,’ असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ‘विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून, शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे,’ असेही आवाहन विभागाने केले आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के आहे.‘नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.

खरिपातील भात (धान) ज्वारी, बाजरी, नाचणी (राणी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या पिकांसाठी शेतकऱ्यांना भाग घेता येईल,’ असे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी स्पष्ट केले.‘योजनेत भाग घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई- पीक पाहणी बंधनकारक आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक, ७-१२ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र बँकेत देणे आवश्यक आहे. याशिवाय सामान्य सुविधा केंद्र (सीएससी), आपले सरकार सुविधा केंद्र येथे किंवा https://pmfby.gov.in या पोर्टलवरूनही अर्ज भरता येईल.

या अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या १४४४७ या क्रमांकावर संपर्क करावा. अथवा कृषी विभागाच्या https://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी,’ असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.केंद्र सरकारने निश्चित केलेले शुल्क संबंधित विमा कंपनीमार्फत ‘सीएससी’ विभागाला दिले जाते. एखाद्या अर्जदाराने फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पुढील किमान पाच वर्षे काळ्या यादीत टाकून सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. ई-पीक पाहणी, विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.